‘लॉर्ड’ शार्दूल ठाकूर अडकणार लग्नबंधनात! थाटात पार पडला साखरपुडा…या मराठी मुलीशी होणार..

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची लाट आलेली पाहायला मिळत आहे. हीच लाट आता क्रिकेटमध्येही पोहोचलेली पाहायला मिळत आहे. अर्थात यामुळे क्रीडारसिक खूष झालेले पाहायला मिळत आहे. भारताचा युवा स्टार क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला. त्यामुळे आता त्याचे चाहते त्याच्या लग्नाच्या तारखेची वाट पहात आहेत.

मुंबईच्या पालघरचा असलेला शार्दूल आपल्या क्रिकेटमुळे पालघर मधूनच रसिकांच्या समोर आला आहोत. त्याने कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या कॅप्टनसीखाली काही सामने खेळले आहेत. मात्र त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघात खेळताना. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवल्यानंतर त्याने आपल्या खेळाने संघात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याचे अर्धशतक फारच लक्षवेधी ठरले. वॉशिंग्टन सोबत मिळून त्याने पूर्ण केलेले हे अर्धशतक भारतीय संघाला मालिका जिंकून देण्यात मोलाचा ठरला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shardul Thakur (@shardul_thakur)

मर्यादित षटकात सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दूल ठाकूरने नाव कमावले आहे. भारतीय संघाला गरज लागेल तेव्हा विकेट घेणारा आणि कठीण प्रसंगी फलंदाजी सांभाळणारा शार्दूल क्रीडारसिकांमध्ये ‘लॉर्ड’ म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण खेळण्याच्या शैलीमुळे तो क्रीडारसिकांमध्ये लोकप्रिय आहे. चार कसोटी, 15 एक दिवसीय आणि 24 टी -20 सामने खेळत शार्दूलने आपल्या धमाकेदार कामगिरीचे दर्शन घडवले आहे.

अशा या अष्टपैलू खेळाडूने साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या BKC येथील हॉलमध्ये शार्दुल ठाकूरचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्याला मोजक्याच पाहुण्यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाले. सध्या सोशल मीडिया वर या सोहळ्याचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. शार्दूलने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकर बरोबर साखरपुडा केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shardul Thakur (@shardul_thakur)

आता चाहत्यांना हे दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न पडला आहे. तर हे लग्न पुढच्या वर्षी २०२२ मध्ये पार पडणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्स मधून समजते. २०२२ चा टी-२० सामना संपल्यानंतर हा विवाह सोहळा संपन्न होईल, असेही या रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे. शार्दूल आणि मितालीला त्यांच्या साखरपुड्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

आपल्या आवडत्या सेलिब्रेटींची अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सना फॉलो करा. तसेच तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.