शाहरुख खानने फुंकर मारली की थुंकला…? सोशल मीडियावर होत आहे ट्रोल! जाणून घ्या सत्य..

मित्रहो सोशल मीडियावर हल्ली अनेक बाबींवर जोरदार चर्चा सुरू आहे, त्यातच आता पुन्हा एकदा किंग शाहरुख सुद्धा येतोय सर्वांच्या नजरेत. सोशल मीडियावर अनेक नेटकरी शाहरुखला ट्रोल करत आहेत, लता दिदींच्या पार्थिवावर थुंकून त्याने त्यांचा अपमान केल्याचा त्याच्यावर आरोप केला जात आहे. लता मंगेशकर यांचे अनेक चाहते या अभिनेत्याला दोष देत आहेत, बॉलिवूड चा बादशहा शाहरुख खानने जे काही केले ते अनेकांना चुकीचं वाटत आहे. पण मित्रहो हे करणे त्याच्या परंपरेचा एक भाग होता

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दिदींच्या अंत्यदर्शनासाठी आल्यावर आधी शाहरुखने दुवा मागितली, मग त्याने हात जोडून नमस्कार केला. नंतर शाहरुखने मास्क काढला व तो पार्थिवावर थुंकला हे व्हिडीओ मध्ये दिसून आले आहे असे अनेकजण म्हणत आहेत. असा ठाम आरोप करून ट्रोलर्स शाहरुखला खुप ट्रोल करत आहेत. तसेच या व्हिडीओ वर अनेकांनी कमेन्ट केली असून, त्याने लता दिदींचा अपमान केला असा त्याच्यावर आरोप करत आहेत. त्याच्यावर टीका करत आहेत.

मात्र मंडळी आम्ही तुम्हास सांगू इच्छितो की पार्थिवावर नमस्कार करून फुंकर मारणे ही एक इस्लाम धर्माची परंपरा आहे….आणि अभिनेता शाहरुख खानने देखील आपल्या परंपरेचे अगदी प्रामाणिकपणे पालन केले इतकेच. पण त्याच्या या कृतीवर ट्रोलर्स खूप पेटून उठले असून, यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियावर आपली मते मांडत आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने या घटनेवर विचार करत आहे.

यावर संजय राऊत यांनी म्हणले आहे की ट्रोलरच देशाची वाट लावत आहेत, विचारवंत नौशाद उस्मान, मुस्लिम अभ्यासक यांनी देखील सांगितले की याला थुंकणे म्हणत नसून ही एक मुस्लिम समाजात दुवा केल्यानंतरची परंपरा आहे. शाहरुखची ही प्रथा मात्र खुपजनांना गोंधळात टाकत आहे, अनेकांना या परंपरे बद्दल माहिती नाही त्यामुळे त्याच्या या कृतीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आल्या आहेत.

भारताची कोकिळा लता मंगेशकर यांनी नुकताच सर्वांचा निरोप घेतला आहे, त्यांच्या अशा आकस्मित निधनाने संपूर्ण देशभर नाराजी पसरली आहे. सर्व श्रोते रसिक खूप भावुक झाले आहेत. त्यांच्या स्मरणाची गाथा सोशल मीडियावर सुरू असतानाच अचानक शाहरुखची चर्चा सुरू झाली होती. आता सोशल मीडियावर खूपशा गोष्टी चर्चेसाठी मिळत आहेत. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.