विलासराव देशमुख यांच्या तिनी सुना आहेत फिल्मी बॅकग्राऊंड मधून, एक तर आहे खूप सुप्रसिद्ध अभिनेत्री नाव ऐकून थक्क व्हाल..

एका घरात एकाच क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. असेच काहीसे चित्र एका राजकीय नेत्याच्या घरी सुद्धा आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आणि काॅंग्रेसचे नेते विलासराव चव्हाण यांच्या तिन्ही सुना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत.

रितेशची पत्नी जेनेलिया हीच केवळ फिल्म क्षेत्रात असल्याचे बऱ्याच जणांना माहिती आहे. पण देशमुख कुटुंबातील इतर दोन सुनांनाही फिल्मी बॅकग्राऊंड असल्याचं फारच कमी लोकांना माहिती आहे.

देशमुख घराण्यातील एक मुलगा रितेश देशमुख हा अभिनेता असल्याचं सर्वांना माहितच आहे. त्याची पत्नी जेनेलिया ही देखील अभिनेत्री आहे. या दोघांकडे क्युट कपल म्हणून पाहिलं जातं. रितेश आणि जेनेलिया ने केलेल्या “तुझे मेरी कसम” या चित्रपटानंतर त्यांचे बंध जुळून आले.

त्या दोघांनी ३ जुलै २०१२ ला लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष गोष्ट अशी की यांचं दोन वेळा लग्न झालं आहे. कारण रितेश हिंदु आहे आणि जेनेलिया ख्रिश्चन आहे. त्यामुळे त्यांनी एकदा हिंदु आणि एकदा ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने आपला विवाह करून घेतला.

रितेश आणि जेनेलिया यांना राहिल आणि रियान अशी दोन अपत्य आहेत. रितेश – जेनेलिया दोघेही सोशल मिडियावर चांगलेच ॲक्टिव्ह असतात. अधुन मधून ते आपल्यासह आपल्या मुलांचेही फोटो अपलोड करत असतात.

विलासराव देशमुख हे राजकारणातील एक मोठं नाव होतं. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत यश मिळवलच सोबत त्यांच्या तिन्ही मुलांनी सुद्धा आपापल्या आयुष्याची घडी नीट बसवण्यात यशस्वी ठरले आहेत. विलासराव देशमुख यांना अमित देशमुख, रितेश देशमुख आणि धीरज देशमुख अशी तीन मुले आहेत.

अमित देशमुख हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सुद्धा राजकारणात एक विशेष स्थान निर्माण केलंय. मधला मुलगा रितेश देशमुख अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आजवर अनेक सिनेमे करून रसिकांची मने जिंकली आहेत.

हिंदी बरोबरच मराठी भाषेमधूनही त्यांनी काम केले आहे. देशमुख यांचे तिसरे चिरंजीव अर्थात धीरज देशमुख हे सुद्धा नुकतेच राजकारणात सक्रिय झाले असुन अलीकडेच त्यांना काॅंग्रेसकडून पहिल्याच प्रयत्नात आमदारकीही मिळाली आहे.

अमित देशमुख यांची पत्नी आदिती प्रताप या आहेत. २००८ साली दोघे विवाहबद्ध झाले आहेत. आदिती प्रताप या सुद्धा एक अभिनेत्री आहे. आता त्या इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसल्या तरी पुर्वी त्यांनी बरीच छोटी – मोठी कामे केली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Deshmukh (@aditi_deshmukh)

अमित – आदिती यांना अवीर आणि अवान ही दोन मुले आहेत. अमित देशमुख आणि आदिती प्रताप देशमुख यांचं ॲरेंज मॅरेज आहे. देशमुख कुटुंबातील धाकटे पुत्र धीरज देशमुख यांच्या पत्नीही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्यक्ती आहेत.

धीरज देशमुख यांचा विवाह दिपशिखा भगनानी यांच्याशी झाला. दिपशिखा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये निर्मात्या म्हणून काम करत असतात. २०१२ सालीच या दोघांनी लग्न केले होते. या दांपत्याला वंश आणि दिवियान अशी अपत्य आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepshikha Deshmukh (@deepshikhadeshmukh)

बाॅलीवूडमधील एक निर्माते वासू भगनानी यांची कन्या दिपशिखा या आहेत. त्याबरोबरच अभिनेता जॅकी भगनानी यांच्या त्या बहिण आहेत. सध्या देशमुखांच्या सुनांपैकी जेनेलिया हिच फक्त बाॅलिवुड मध्ये कार्यरत असली तरी इतर दोघी आदिती प्रताप आणि दिपशिखा भगनानी यांनाही फिल्मी बॅकग्राऊंड असल्याचं दिसुन येतं.