अभिनेत्री होण्याआधी अभिज्ञा करत होती हे काम ऐकून विश्वास बसणार नाही..

मित्रहो कलाक्षेत्रात अनेक कलाकार कार्यरत आहेत, त्यांच्या कलेने त्यांना लोकप्रिय आणि प्रसिद्ध बनवलेले असते. त्यामुळे अनेक रसिक मंडळी आपोआप त्यांचे चाहते बनतात, आणि मग कलाकार तसेच चाहते यांच्यात छान बॉंडिंग तयार होते. ही बॉंडिंग त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल जाणून घेण्यास चाहत्यांना प्रवृत्त करते आणि मग सोशल मीडियावर या कलाकारांच्या चर्चा रंगून त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी माहीत होतात. आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल खास माहिती जाणून घेणार आहोत जिने चाहत्यांशी आपले एक छान नाते बनवले आहे.

अनेक मालिकांतून नेहमी आपल्या भेटीस येणारी अभिनेत्री अभिज्ञा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या अनेक पोस्ट नेहमी चर्चेत येत असतात, खूपशा व्हिडीओ मधून देखील ती नेहमी चाहत्यांशी संपर्क साधत असते. मित्रहो अभिज्ञा आता “खुलता कळी खुलेना” तसेच “तुला पाहते रे” या मालिकांनंतर “तू तेव्हा तशी” या मालिकेत दिसणार आहे. तिला या मालिकेत पाहण्यासाठी तिचे सर्व चाहते भलतेच उत्सुक झाले आहेत. पुन्हा एकदा अभिज्ञा पडद्यावर दिसणार असल्याने आता वातावरण छान बनले आहे.

अभिज्ञा सुद्धा “तू तेव्हा तशी” या मालिकेत आपणाला मिळालेल्या संधीसाठी खूप खुश आहे, तिने तिची उत्सुकता एका व्हिडीओ द्वारे चाहत्यांशी शेअर केली आहे. या व्हिडीओ मध्ये ती खूप खुश दिसत आहे, तिने आपली उत्सुकता व्यक्त करताना सांगितले की “तू तेव्हा तशी या मालिकेत मी पण दिसणार आहे, यामध्ये माझी भूमिका नेमकी काय आहे,नकारात्मक आहे की सकारात्मक आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. जेवढ्या आतुरतेने मी वाट पाहत आहे तेवढ्याच आतुरतेने तुम्हीही वाट पहा..”

मंडळी अभिज्ञा ही एक अभिनेत्री आहे हे आपल्या सर्वानाच माहीत आहे, पण ती अभिनेत्री होण्याआधी एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होती. आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की अभिज्ञा यापूर्वी एक हवाई सुंदरी होती, पण तिला अभिनयाची खूप आवड होती. तिला तिची ही कला अजिबात स्वस्थ बसू देत न्हवती. त्यामुळे मग तिने आपले अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. इथे तिच्या प्रयत्नांना भरभरून यश मिळाले, तिच्या अभिनयाला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

आजवर अभिज्ञाच्या सर्व भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत, त्यामुळे आता तिच्या नव्या भूमिकेला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याने, तिला अनेकजण छान छान कमेन्ट करत आहेत. “तू तेव्हा तशी” ही मालिका लवकरच आपल्या भेटीस येणार आहे, या मालिकेचे कथानक काय असेल हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यातील अभिज्ञाच्या भूमिकेला पुन्हा एकदा चांगला प्रतिसाद मिळो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.