बिगबॉस मधील हि लोकप्रिय जोडी पुन्हा आलीय चर्चेत, या जोडीने केलंय असं काही काम कि

सुप्रसिद्ध टीव्ही शो म्हणजेच बिग बॉस 13 या कार्यक्रमा मधून सुप्रसिद्ध झालेल्या जोड्यांपैकी एक सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे सिडनाज “sidnaj” म्हणजेच सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल. बिग बॉस  सीजन १३ हा बिग बॉस शो चा इतिहासातील सर्वात लोकप्रिय सीजन ठरला.हा सीजन सर्वात जास्त पहिला गेला व यशस्वी ठरला.

या सीझनचा यशामागे त्या सीजन मधील कलाकारांचा खूप मोठा हात आहे. त्या सीजनमध्ये तीन जोड्या खूप प्रसिद्ध झाल्या एक म्हणजे सर्वात लोकप्रिय सिद्धार्थ शुक्ला व शेनाज दुरसे असीम रियाज व हिमांशी खुराना आणि तिरसे म्हणजे पारस छाबरा व महिरा शर्मा. हा सीजन सर्व बाजूनी परिपुर्ण ठरला यामध्ये आपल्याला विनोद, इमोशन्स,ॲ क्श न सर्व काही पाहायला मिळाले.

या शो ची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी या सीझनला तब्बल पाच आठवडे वाढविले होते व सलमान खान यांना तब्बल दोन कोटी रुपये पर एपिसोडे जास्त मिळाले होते अशी बातमी बाहेर आली होती.पाच आठवडे वाढवून देखील असे वाटायचे की हा सीजन संपायला नको अशी प्रेक्षकांची इच्छा होती. कारण या शोची लोकप्रियता एवढी वाढली होती की चाहत्यांना रात्र कधी होईल व कधी बिगबॉस शो पाहू असे वाटायचे. त्यामागील मुख्य कारण म्हणजे शहनाज गिल व इतर कलाकार. शहनाज गिल यांनी आपल्या विनोदी स्वभावामुळे  जनतेचे खूप मनोरंजन केले.

या शोमधील अजून तीन मुख्य कलाकार होते ते म्हणजे सिद्धार्थ शुक्ला,असीम रियाज व पारस छावरा. सिद्धार्थ शुक्ला व असीम रियाज यांचा मध्ये सुरुवातीला खूप चांगली मैत्री होती मात्र काही कारणास्तव पुढे जाऊन ते एकमेकांचे शत्रू झाले त्यांच्यात लहान-लहान बाबींवरून वा द व्हायला लागेल. व हेच दोन कलाकार फायनल मध्ये देखील पोहोचले व सिद्धार्थ  शुक्ला हे सीजन १३  जिंकले.

शो संपल्यावर देखील या कलाकारांनी आपल्या जोडीदाराची साथ सोडली नाही. ते आजच्या प्रसंगावरून दिसून आले. शेहनाज गिल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ त्यांच्या चाहत्या करिता अपलोड केला होता. व त्या विडिओ खाली एका यूजर ने असे काही कमेंट केली ज्यामुळे सुद्धा शुक्ला यांना समोर येऊन त्यांना उत्तर द्यावे लागले.

त्या व्हिडिओ खाली एका सोशल मीडिया युजर ने अशी कमेंट केली होती की ‘ शहनाज गिल यांनी उत्तम प्रयत्न केले आहेत मात्र व्हिडीओ शूट करण्यासाठी  चांगला फोन वापरायला हवा होता…’
त्यावर सिद्धार्थ शुक्ला प्रतिक्रिया देत म्हणाले ‘भाई मी आपल्याला नम्रपणे असे सांगू इच्छितो की हा व्हिडिओ त्यांनी आपल्या फॅन्स करिता शक्य तेवढ्या चांगल्या फोन मध्ये काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर आपल्याला हा व्हिडीओ योग्य वाटत असेल तर आपण आपल्या प्रोफाइल वर का टाकला ‘ हे इंग्रजीतील संवा द मराठीत अनुवा द केले आहेत.

याप्रकारे शहनाज गिल यांच्या बचावासाठी पुढे येऊन सिद्धार्थ शुक्ला यांनी #sidnaj या जोडीच्या चाहत्यांना अगदी खूष केले. या प्रसंगाबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा व आपल्या हा लेख आवडले असता मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद!

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.