कीर्तनकार शिवलीला पाटील आणि तृप्ती देसाई दिसणार मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात…

हिंदीत जसा बिग बॉसचा क्रेज आहे तसा आता मराठी प्रेक्षकांच्या मनात देखील आपला मराठी बिग बॉस या शो बद्दल आवड निर्माण झाली आहे. मराठीत बिग बॉस आल्याने हे चालेल का अशी चिंता सर्वानाच होती पण कमी वेळेत या शो ने सर्वांचे मनोरंजन केले. बिग बॉसच्या घरात वा’द वि’वा’द होत राहतात हेच पाहण्यासाठी प्रेक्षक आवडीने बिग बॉस पाहत असतात खऱ्या आयुष्यात असणारे हे सुप्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री त्यांच्या खाजगी आयुष्यात कश्या पद्धतीने वागत असतात. त्यांच्यात कोणत्या प्रकारचा इगो असतो हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस हे चांगले माध्यम आहे.

पण यावेळी बिग बॉस या रियालिटी शो मध्ये एक वेगळा वर्गीय प्रेक्षक जमा करण्यासाठी काही गाजलेल्या पण स्टारडम नसलेल्या काही लोकांना बिग बॉसमध्ये राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. बिग बॉसची ही नवीन खेळी चॅनेलला नवीन टीआरपी घेऊन देण्यात मदत करेल हे नक्की! स्टारडम नसलेल्या पण समाजात एक प्रसिद्धी मिळवलेल्या काही स्त्रिया आता बिग बॉसमध्ये तुमच्या भेटीस येत आहेत.

बिग बॉस तुम्हाला यावेळी सोशल मीडियावर सुप्रसिद्ध असलेल्या इंदुरीकर महाराज सारख्या अप्रतिम आणि समाजाला प्रेरणा देणाऱ्या कीर्तनकार शिवलीला ताई यावेळी बिग बॉसमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यामुळे वारकरी संप्रदाय यावेळी हे बिग बॉस पाहणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. कीर्तनकार शिवलीला पाटील या रूढी परंपराचा अभ्यास असणारे व्यक्तव्य करत असतात. यातून ते समाजाला एक वेगळी प्रेरणा मिळवून देतात.

आता बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनला नुकताच सुरवात झाली आहे पहिल्याच दिवशी वा’दग्र’स्त असलेल्या या शो मध्ये भां’डण आपल्याला पाहायला मिळाले. या बिग बॉस शो मध्ये कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्यासोबत प्रसिद्ध समाजसेविका ज्या महिलांना अंधारातून उजेडाकडे घेऊन जात असतात अश्या तृप्ती देसाई आपल्याला बिग बॉसमध्ये पाहायला मिळणार आहेत.

एन्ट्री करताच तृप्ती देसाई यांनी ‘मोडेल पण वाकणार नाही’ असा इशारा बिग बॉस मधील कंटेंस्टंट याना दिला आहे. तृप्ती देसाई या खूप आ’क्र’मण स्वभावाच्या आहेत त्यामूळे आता बिग बॉसमध्ये काय होईल याची हूर सर्वाना लागली आहे. त्यामुळे नक्की पाहत राहा. कलर्स मराठी वाहिनीवर आपला मराठी बिग बॉस सिजन ३. याचबरोबर तुम्हाला शिवलीला पाटील आणि तृप्ती देसाई यांच्याबद्दल काय वाटत हे कमेंट्स मध्ये कळवा.