“फुलाला सुगंध मातीचा” या मालिकेतील एका कलाकाराने सोडली मालिका, पाहा काय आहे कारण..

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असणारी प्रेक्षकांच्या पसंतीची एक मालिका म्हणजे “फुलाला सुगंध मातीचा” ही होय. मालिकेचे कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे मालिका चर्चेत असतेच, पण आता एका वेगळ्याच कारणामुळे ही मालिका चर्चेत आली आहे. या मालिकेचे महाराष्ट्र भर लाखो चाहते आहेत. या मालिकेत काम करणारा एक कलाकार अचानक मालिका सोडली आहे. आता हा कोण कलाकार आणि मालिका सोडण्याचे नेमके कारण काय आहे, याविषयी जाणून घेऊया.

“फुलाला सुगंध मातीचा” ही मालिका या कलाकाराने सोडल्यामुळे काही चाहते नाराज झाले आहेत. आपल्या कुठल्याही आवडत्या मालिकेतील आवडत्या कलाकाराने मालिका सोडली म्हटलं की प्रेक्षक तर नाराज होणारच.
आवडता कलाकार मालिकेत दिसणार नसल्यामुळे रसिकांमधली नाराजी आता सोशल मिडीयावर उमटत आहे. पण त्याच्या चाहत्यांना काळजी करायचं कारण नाही. कारण हा कलाकार प्रेक्षकांसमोर एका नव्या मालिकेतून भेटीला येणार असल्याचे कळत आहे.

या बातमीमुळे त्या कलाकाराचे चाहते काहीप्रमाणात सुखावले आहेत. आता आपल्याला उत्सुकता लागली असेल की तो अभिनेता नेमका आहे तरी कोण ? ज्या अभिनेत्याबद्दल बोललं जात आहे त्याचं नाव आहे, श्रेयस राजे. या अभिनेत्याने फुलला सुगंध मातीचा मध्ये त्याची भूमिका खूप प्रमाणिक पणे उत्तम रित्या साकरलेली आहे; म्हणूनच चाहते त्याला मिस करतायत. एवढं भरभरून प्रेम देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Raje (@shreyas_raje)

श्रेयसची “फुलाला सुगंध मातीचा” मधील भुमिका अतिशय वेगळी होती. ज्यामधे अभिनयाला खूपसा वाव होता. याच संधीचा लाभ उठवत त्याने ही भूमिका सुंदररित्या वठवली होती. त्याने त्या भूमिकेला न्याय दिला आहे. अभिनेता श्रेयस राजे फुलला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये राजकुमार याची भूमिका साकारत होता. निगेटीव्ह शेडमध्ये त्याची भूमिका होता. त्याची भूमिका निगेटिव्ह असली तरी चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरत होती. हल्ली प्रेक्षकांना निगेटिव्ह रोल आकर्षित करत असतात. त्याचप्रमाणे राजकुमार या पात्रावरही प्रेक्षक आकर्षित झाले होते.

त्याला आधी काही कामांचा अनुभव होता म्हणून मालिकेत त्याने भूमिका चांगल्या प्रकारे वठवली. अनुभव असेल तर माणूस दिवसेंदिवस चांगलेच काम करत जातो. श्रेयसने ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेआधी ‘मोलकरीण बाई’ या मालिकेत झळकला होता. याशिवाय ‘जिगरबाज’, ‘भेटी लागी जीवा’ या मालिकांमध्येही काम केले आहे. इतर मालिकांमध्येही त्याच्या भूमिका चांगल्या होत्या. त्या प्रेक्षकांनी लक्षातही ठेवल्या. केवळ मालिकाच नाही तर श्रेयसने सिनेमातही काम केले आहे. “बाबांची शाळा” या सिनेमात त्याने काम केले आहे. इमोशनल असणाऱ्या या चित्रपटाने बरेच ॲवाॅर्ड मिळवले होते.

आता मात्र श्रेयस नव्या मालिकेत काम करत असला तरी स्टार प्रवाह सोबत नाही तर झी मराठी सोबत करत आहे. “फुलाला सुगंध मातीचा” या मालिकेनंतर श्रेयस “ती परत आलीय” मालिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे सध्या प्रोमोही टीव्हीवर झळकत आहेत.’ती परत आलीये’ असं विजय कदम यांचा प्रोमो रसिकांना चांगलाच आवडत आहे. कारण मालिका यावरून उत्कंठावर्धक असेल याची सर्वाना उत्सुकता लागलेली आहे.

“फुलाला सुगंध मातीचा” ही मालिका सोडण्याचं श्रेयसचे हे कारण आहे. श्रेयस राजे ला त्याच्या “ती परत आलीये” आणि त्यासोबतच इतर आयुष्यातील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. बाकी तुम्हीही काळजी घ्या सुरक्षित रहा. नवनवीन गोष्टी घेऊन आपण भेटूच.