‘श्री कृष्ण’ मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारणारा हा अभिनेता आता इतक्या वर्षांनी दिसतोय असा, वयाच्या ४७ व्या वर्षी अभिनय सोडून करत आहेत हे काम..

मित्रांनो ही बॉलिवूड दुनिया खूप ग्लॅम’रस आहे यात कोणता अभिनेता कधी फेमस होईल याचा नेम नाही पण फेम मिळाला म्हणून सगळं काही होत नाही ते टिकवून ठेवण्यासाठी सतत काम करावी लागतात मग कुठे लोक अभिनेत्याना लक्षात ठेवतात.

मागील काही दशकात खूप सारे अभिनेते अशे पाहिले गेले की, जे त्यांच्या काळात खूप प्रसिद्ध होते, पण आज त्यांना कोण्हीच ओळखत नाही त्यांचा विसर सर्वाना पडला आहे, आज ते गुमनाम आयुष्य जगत आहेत.

आपल्यापैकी बर्‍याचजणांना रामानंद सागर यांची ‘श्री कृष्णा’ ही नव्वदच्या दशकात प्रसारित केलेली मालिका आठवते का? या मालिकेत श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा साकारणारा मुख्य अभिनेता सर्वदमन डी बॅनर्जी यांनी आपल्या गोड हस्याने लोकांची मने जिंकली होती. त्यांना लोक आज सुद्धा त्यांच्या भूमिकेसाठी चांगलेच ओळखतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sarvadaman D. Banerjee (@sarvadaman_d.banerjee)

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, त्याची भूमिका लोकांच्या मनात इतकी खोलवर शिरली की प्रेक्षकांनी त्याचा चेहरा श्रीकृष्णाच्या चेहऱ्याशी जोडून टाकला. सर्वदमन डी बॅनर्जी यांनी केवळ श्रीकृष्णच नव्हे तर जय गंगा मैया, अर्जुन अशा बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या आहेत.

टीव्ही व्यतिरिक्त सर्वदमन डी बॅनर्जी यांनी आपल्या कारकिर्दीत बर्‍याच अध्यात्मिक चित्रपटांमध्येही काम केली आहेत, त्यांनी या चित्रपटात अध्यात्मतेच्या भूमिका केल्या आहेत ते चित्रपट ‘आदि गुरु शंकराचार्य, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर पुरुषांची भूमिका रुपेरी पडद्यावर आणून त्यांनी त्यावर आपल्या सुंदर हस्याने प्रकाश टाकला आहे.

त्यांनी बर्‍याच दुसऱ्या भाषेतील चित्रपटांमध्येही काम केल आहे, ते म्हणजे बंगाली चित्रपट आणि तेलगू चित्रपटांमध्येही त्यानी आपली अभिनय कला दाखवली आहे.

मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की सर्वदमन डी बॅनर्जी यांनी सुशांत सिंग राजपूतच्या ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’मध्येही काम केले होते. या चित्रपटात ते सुशांतसिंग राजपूतच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असल्यामुळे त्याच्या व्यक्तिरेखेला फारसे पसंती मिळाली नाही. पण हा चित्रपट खूप सुपरहिट झाला याने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sarvadaman D. Banerjee (@sarvadaman_d.banerjee)

अश्या खूप साऱ्या मालिकेत दिसणारे सर्वदमन डी बॅनर्जी आज कोठे आहेत? ते काय करीत आहे ? हा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात आला असेल तर आम्ही आज त्याबद्दल सांगणार आहोत. मित्रांनो सर्वदमन डी बॅनर्जी सध्या उत्तराखंडच्या ऋषिकेश येथे एक स्वयंसेवी संस्था चालवित असतात जे मुलांना मदत करतात. एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, अभिनय जगतात ते फक्त ४५ ते ४७ वर्षे काम करणार असे म्हणाले होते. म्हणून ते सध्याला स्वत: चा परिपूर्ण वेळ मुलांच्या सेवेत घालवतात.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.