यलो यलो, सुंदर फेलो! ब्युटीफुल श्रुती मराठेच्या या नव्या फोटोंवर चाहते फिदा…

अभिनेत्री श्रुती मराठेने ‘राधा ही बावरी’ या मालिकेतून रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या मालिकेत तिने एका शांत स्वभावाच्या डॉक्टरची भूमिका केली होती जी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आणि काहीसे निश्चिंत आयुष्य जगणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडते. या मालिकेनंतर ती इतकी लोकप्रिय झाली की लोक तिला प्रत्यक्ष आयुष्यातही ‘राधा’ या नावानेच ओळखू लागले होते.

सनई चौघडे (२००८) या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यानंतर तिने बऱ्याच मालिका आणि चित्रपट केले. तिने काही हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. रुद्रकाल आणि बार्ड ऑफ ब्लड सारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे. संत सखू आणि लग्नबंबाळ सारख्या नाटकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.

श्रुती मराठे सोशल मीडिया वर बरीच सक्रीय असते. आपले वेगवेगळ्या गेटअप मधले फोटो ती नेहमीच पोस्ट करताना दिसते. तिच्या या फोटोजना तिच्या चाहत्यांची भरभरून पसंती मिळताना दिसते. अलीकडे तिने आपले काही नवीन फोटो सोशल मीडिया वर शेअर केले. तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. आपल्या वेस्टर्न ड्रेसमध्ये श्रुती खूपच सुंदर दिसते आहे.

पिवळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये श्रुतीने हे आऊटडोअर फोटोशूट करून घेतलेले पाहायला मिळते. फोटोग्राफर शशांक साने यांनी हे फोटोशूट केले आहे. शशांक साने सेलिब्रेटी फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात. वेगवेगळ्या सेलिब्रेटींचे मनमोहक फोटो घेण्यात ते तरबेज आहेत. श्रुतीचेही असेच काही मनमोहक फोटो त्यांनी टिपले आहेत. या फोटोंमध्ये श्रुती खूपच बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा सडा शिंपडला आहे. कुणी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे, तर कुणी तिच्या मोहक अदांवर फिदा आहे. काहींना तिचे डोळे भावले आहेत, तर काहींना ती त्या पिवळ्या रंगामध्ये खूप सुंदर दिसत आहे. ‘हॉट इन यलो’, ‘यलो यलो, सुंदर फेलो’ अशा कमेंट्स तिला मिळताना दिसत आहेत. ऋतुजा बागवे या अभिनेत्रीनेही श्रुतीच्या या फोटोंवर हार्ट इमोजी टाकले आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत श्रुतीवरील आपले प्रेम व्यक्त केले आहे.

तर मंडळी, तुम्हाला श्रुतीचा हा ब्युटीफुल यलो लूक कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तसेच आमचे आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.