मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेचा झक्कास मान्सून फोटोशूट पाहिलात का? पाहून चाहते झालेत अधिकच घायाळ!

नुकताच उन्हाळा संपला, आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच आपल्याकडे पावसाने हजेरी लावली. तसे तर सगळेजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येकाचा आपापला एक पाऊस असतो. व त्याची वाट बघण्याची आपापली काही कारणं असतात.

बाहेर पाऊस पडत असतो आणि आत छान मस्त प्रेमगीतं लावली जातात. कोणी पाऊस असा एन्जॉय करतात. तर कुणाला पावसाची लागलेली संततधार पाहायला आवडतं. कुणी थेट निसर्गाच्या सानिध्यात जातं, घाटमाथ्यावर जाऊन पावसाचा आनंद घेत असतं, तर कुणी धबधब्यात मनसोक्त भिजतं.

संध्याकाळ झाली आहे आणि आभाळ भरून आलं आहे, आणि पाऊस सुरू होतो. अनायसे चहाची वेळ झालेली असते, आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून भजीचा बेत केला जातो. हा संध्याकाळचा पाऊस रंगात येतो आणि सोबत असतो वाफाळलेला चहा व मस्त कुरकुरीत भजी. अहाहा स्वर्गसुख अनुभवण्याचे असे काहीच पर्याय असतात.

असाच पावसाचा आनंद घेतानाचे काही क्षण आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत अभिनेत्री श्रुती मराठेने. तिने यावर्षीचा पाऊस एन्जॉय करताना तिने एक मस्त फोटोशूट केलं आहे. पावसात भिजल्यामुळे श्रुतीचं रूप अजूनच खुलून आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrutii Marrathe (@shrumarathe)

तिने यासाठी सुंदरशी पिवळी साडी नेसली आहे. आणि एकाहून एक अशा दिलखेचक अदांनी तिने फोटोशूटला रंगत आणली आहे. त्या अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाचं पाणी पाणी झालं आहे. श्रुती आपले खूप छान व्हिडिओज् आणि फोटोज इंस्टा आणि फेसबुक वर टाकत असते.

आता या पोस्टमध्ये तिचे सुंदर फोटो असल्यामुळे पोस्ट खुलली आहेच पण याला चार चांद लागलेत ते तिने टाकलेल्या ओळींमुळे…

कभी बेपनाह बरस पडी,
कभी गुमसी हैं।
ये बारीश कुछ कुछ
तुमसी हैं।

याआधी ही प्रेक्षक सीरिअल्स, Bollywood आणि Tollywood चे सिनेमे, नाटकं आणि वेबसेरीज पाहिल्यामुळे श्रुतीचे दिवाणे आहेतच आता तर या पावसातल्या फोटोंमुळे तिच्या पोस्टवर चाहते कमेंट्स आणि लाईकची बरसात करत आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.