माय बिना पोरं! अनाथांची माय सिंधुताई यांचा अखेरचा श्वास, या कारणांमुळे झाले दुःखत निधन…

अनाथांची माय म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांची हल्लीच प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर औषध उपचार म्हणून पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मागील महिन्यात २४ डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर हरण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. सिंधुताई सपकाळ यांच्या समाजसेवा कार्याचा आढावा घेऊन २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

घरातील आर्थिक परिस्थिती बिकट होती याचबरोबर आईचा सिंधुताई यांच्या शिक्षणाला विरोध होता. यामुळे सर्व बाजूंनी सिंधुताई सपकाळ यांच्या शिक्षणाला खीळ बसली. सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या नवव्या वर्षी आपल्यापेक्षा वयाने खूपच जास्त असणाऱ्या व्यक्तीशी लग्न झाले. लग्न झाल्यानंतर सिंधुताई यांचा संघर्ष संपला नव्हता! त्यांना घर सोडावे लागले. गोठ्यात मुलीला जन्म द्यावा लागला. रस्त्यावर रेल्वेस्थानकावर थांबून भीक मागावी लागली. एवढे सर्व कष्ट झेलून त्यांना खरी उम्मीद मिळाली ती मुलीच्या जन्मानंतर त्यांचा संघर्ष पुन्हा चालू राहिला. सामाजिक अत्याचारांना बळी पडून गेलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलांसाठी सुमारे महाराष्ट्रात सहा अनाथ आश्रमांची स्थापना केली.

या अनाथ मुलामुलींसाठी त्यांनी मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा हा दिला. त्यांच्यामार्फत चालू झालेल्या आश्रम यांनी बेघर महिलांना खूप सारी मदत केली. आतापर्यंत सिंधुताई सपकाळ यांना ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे खुप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर एक चित्रपट देखील चित्रित करण्यात आला आहे त्या चित्रपटाचे नाव आहे ‘मी सिंधुताई सपकाळ’. हा चित्रपट सिंधुताई यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. आज वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचे रात्री ८ वाजून १० मिनिटांनी दुःखत निधन झाले. गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाल्याचे समजले.

त्यांच्या ‘मी सिंधुताई सपकाळ’ चित्रपटाची निवड ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात करण्यात आली होती. जरी आज सिंधुताई आज आपल्यात नसल्या तरी त्यांचा कार्याचा आढावा खूप मोठा आहे यातून प्रत्येकजनाला काहीतरी शिकण्यासारखे आहे. सिंधुबाई सपकाळ यांच्या अचानक जाण्याने खूप लेकरांची आई हरवली आहे हे सध्या दिसून येते. आमच्या टीम कडून देखील सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.