‘सिंघम’ फेम मुरली शर्मा यांची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री! केले आहे या चित्रपटांमध्ये काम…

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने छाप पाडलेला अभिनेता म्हणजे मुरली शर्मा. गोलमाल, सिंघम सारख्या चित्रपटांमुळे मुरली शर्मा या नावाला अधिक प्रसिद्धी मिळाली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतो. मुरली शर्मा जरी प्रसिद्ध अभिनेते असले तरी ते मीडिया पासून लांब राहणेच पसंत करतात. अशा या अभिनेत्याची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे.

मुरली शर्मा यांची पत्नी एक मराठमोळी अभिनेत्री आहे. त्यांचं नाव आहे अश्विनी काळसेकर. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत अश्विनी काळसेकर यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान मिळवलेले आहे. या दोन्ही मनोरंजनसृष्टीत अश्विनी काळसेकरांनी आपल्या अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे अश्विनी यांनी देखील गोलमाल आणि सिंघम सारख्या चित्रपटात काम केलेले आहे. अश्विनी आणि मुरली शर्मा यांनी या दोन्ही चित्रपटांच्या सिरीज मध्ये काम केलेलं असलं तरी या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलेले नाही.

मराठी मनोरंजनसृष्टीतून अश्विनी काळसेकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांना ‘शांती’ या प्रसिद्ध मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. त्यांच्या या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘सीआयडी’ या मालिकेतून. त्यानंतर त्या ‘कसम से’ मालिकेत झळकल्या. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला अनेक पुरस्कारही मिळाले. मालिकांसह त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. खाकी, किसना, आशिक बनाया आपने, अपहरण, फूंक, मुसाफिर सारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा यांनी २००९ मध्ये लग्न केले. अश्विनी यांचे हे दुसरे लग्न. त्यांनी पहिले लग्न अभिनेता नितेश पांडे सोबत केले होते. हे लग्न १९९८ मध्ये झाले होते. मात्र लग्नानंतर चार वर्षांनी दोघे वेगळे झाले. नितेश पांडेने नंतर अभिनेत्री अर्पिता पांडे सोबत लग्न केले. घटस्फोटानंतर काही वर्षांनी मुरली शर्मा अश्विनी यांच्या आयुष्यात आले. दोघांमध्ये सुरुवातीला ओळख आणि नंतर छान मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले. त्यांचा सुखी संसार अजूनही तितकाच छान सुरू आहे.