क्रिकेटर ऋषभ पंतची बहीण आहे इतकी सुंदर! भल्या भल्या अभिनेत्रींनाही देईल मात…

क्रिकेटविश्वात ऋषभ पंतने आपल्या कामगिरीमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मध्यंतरी त्याला खराब फॉर्मशी सामना करावा लागला. मात्र जिद्द आणि चिकाटीमुळे त्याने क्रिकेटविश्वात शानदार पुनरागमन केलेले पाहायला मिळाले. त्याच्या खेळाचे असंख्य चाहते आहेत. मात्र त्याच्याइतकीच त्याची बहीणही लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते. ऋषभची बहीण ही कुणी सेलिब्रेटी नाही. मात्र तरीही ती खूप प्रसिद्ध आहे.

ऋषभ पंतच्या बहिणीचे नाव साक्षी पंत आहे. साक्षीचा जन्म २४ सप्टेंबर १९९५ रोजी झाला. ती ऋषभ पेक्षा २ वर्षांनी मोठी आहे. पंत भाव-बहिणीने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. भाऊ क्रिकेटचे मैदान गाजवतो आहे, तर बहीण सोशल मीडिया सेलिब्रेटी आहे. साक्षी नेहमीच वेगवेगळे फोटो सोशल मीडिया वर शेअर करताना दिसते. साक्षीचे इंस्टाग्राम वर १ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Pant (@sakshi.pant)

साक्षी सध्या युके मध्ये असते. तिथे ती आपले शिक्षण पूर्ण करत आहे. डेहराडूनच्या डून कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यावर ती युके मध्ये गेली आहे. साक्षीला फिरायला खूप आवडतं. ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत असते आणि तेथील फोटो ती आपल्या सोशल मीडिया वर शेअर करत असते. अनेकदा ती आपला भाऊ ऋषभ बरोबरचे काही खास फोटो शेअर करते. तर बऱ्याचदा फॅमिली फोटोही तिच्या सोशल मीडिया वर आपल्याला दिसतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Pant (@sakshi.pant)

साक्षीचे फोटो पाहिल्यावर एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे तिचं सौंदर्य. साक्षी दिसायला खूप सुंदर आहे. तिच्या सौंदर्यापुढे भल्या भल्या अभिनेत्रीही फिक्या पडतील. साक्षी अनेकदा आपल्या भावाला चिअर अप करायला क्रिकेटच्या मैदानावर हजेरी लावत असते. त्यावेळी तिच्या सौंदर्याची जाणीव होते. सहसा क्रिकेटर्सच्या गर्लफ्रेंड्स किंवा बायकोची चर्चा अशावेळी होताना दिसते. मात्र ऋषभ पंतच्या बहिणीची चर्चा तिच्या सुंदरतेमुळे होत असताना दिसते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Pant (@sakshi.pant)

तुम्ही ऋषभ पंतच्या बहिणीचे फोटो पाहिले आहेत का? तुम्हाला साक्षी पंत आवडते का? तसेच तुम्हाला ऋषभ पंतचा खेळ कसा वाटतो? तुमची यावरची मते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या आवडीच्या सेलिब्रेटींच्या आयुष्यातील अशाच काही बातम्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यांचे वेळच्या वेळी अपडेट मिळवण्यासाठी माच्या सोशल मीडिया हॅन्डल्सना फॉलो करा. तसेच तुम्हाला आमचे जे लेख आवडतात, त्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.