स्मृती इराणींच्या मुलीचा पार पडला साखरपुडा! हा आहे केंद्रीय मंत्र्यांचा होणारा जावई…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हे एक नेहमीच चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व आहे. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याच्या त्यांच्या शैलीमुळे त्यांचा एक चाहतावर्ग तयार झाला आहे. स्मृती इराणी सोशल मीडिया वरही नेहमी सक्रीय असलेल्या पाहायला मिळतात. नुकताच त्यांनी आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडिया वर शेअर करत एक आनंदाची बातमी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

स्मृती इराणी यांच्या मुलीचे नाव शनैल इराणी आहे. शनैलचा नुकताच साखरपुडा पार पडला. आपली मुलगी आणि तिचा होणारा पती अर्जुन भल्ला यांचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करत स्मृती इराणी यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यांनी खूप गंमतीदारपणे लिहिले आहे, की “हे त्या माणसासाठी ज्याच्याकडे आता आमची प्रिय कन्या आहे… अर्जुन भल्ला, तुझे आमच्या मॅड फॅमिलीमध्ये स्वागत आहे. एक अतरंगी माणूस तुला सासरा म्हणून आणि मी तुला सासू म्हणून लाभले आहे. त्यामुळे देव तुझे आमच्यापासून रक्षण करो. पुन्हा नको म्हणू की आम्ही तुला सांगितलं नाही म्हणून…”

एका रिपोर्ट नुसार, शनैल इराणी वकील आहे. मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. अमेरिकेतील जॉर्ज टाऊन युनिव्हर्सिटी मध्ये तिने वकिलीचे शिक्षण घेतले. अर्जुन सध्या लंडनमध्ये एमबीए करत आहे. शनैल ही स्मृती इराणी यांचे पती जुबीन इराणी यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. एकदा अभिनेता शाहरुख खानने सोशल मीडिया वर शनैलचा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिली होती, की “माझ्या बालपणीच्या मित्राच्या मुलीचे म्हणजेच जुबीनच्या मुलीचे नाव मी ठेवले होते.”

View this post on Instagram

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

स्मृती इराणी यांच्या या पोस्ट वर अनेक लोकांनी कमेंट करत शनैल आणि अर्जुनचे तसेच स्मृती इराणींचेही अभिनंदन केले आहे. सीमा गोस्वामी, एकता कपूर, मौनी रॉय, बरखा दत्त, सुवीर सरन अशा अनेक सेलिब्रेटींनी या नव्या जोडीचे अभिनंदन केले आहे.

एकता कपूरच्या ‘क्यूँकि साँस भी कभी बहू थी’ या मालिकेतील भूमिकेमुळे स्मृती इराणी घराघरात जाऊन पोहोचल्या. त्यांची ही भूमिका बरीच गाजली होती. मात्र नंतर त्यांनी मनोरंजन क्षेत्र सोडून राजकारणात प्रवेश केला. २००३ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आपली राजकारणातील घोडदौड सुरू केली.

शनैल इराणी आणि अर्जुन भल्ला यांच्या लग्नाची तारीख अजून तरी समजलेली नाही. या दोघांचेही त्यांच्या साखरपुड्याबद्दल अभिनंदन!