…म्हणून मी आजपर्यंत लग्न केले नाही; लता मंगेशकर यांनी सांगितले कारण..

दिग्गज गायिका लता मंगेशकर या आज ९१ वर्षांच्या झाल्या आहेत. १५५८ सालापासून लता मंगेशकरांनी फिल्मफेअर पुरस्कारापासून अनेक पुरस्कार मिळवण्यास सुरुवात केली. २००१ साली त्यांना भारतरत्न पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले. मात्र, त्यांनी अद्यापही लग्न केलेले नाही.

लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. त्या एका मध्यवर्गीय कुटुंबात जन्माला आल्या होत्या. त्यांचे पूर्वीचे नाव ‘हेमा’ असे होते. मात्र, वयाच्या पाचव्या वर्षांनंतर त्यांचे नाव ‘लता’ असे ठेवण्यात आले. लता मंगेशकर यांनी ३६ पेक्षा जास्त भाषांमध्ये ३० हजारापेक्षा जास्त गाणी गायली आहेत.

लता मंगेशकर यांची मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ हे त्यांच्यापेक्षा लहान भावंड आहेत. त्यांचे वडील दीनदयाळ थिएटर कलाकार होते. त्यामुळे वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी लता मंगेशकर यांनी गायन शिकण्यास सुरवात केली. संगीताची कला लता मंगेशकर यांना घरण्याच्या वारस्यामुळे लाभली होती. ५ भावंडांपैकी मोठी असलेल्या लता मंगेशकर यांनी अद्यापही लग्न केले नाही. याचं कारण त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

लता मंगशकर म्हटल्या की, ” मी १३ वर्षांची असताना वडिलांचे नि’धन झाले. यामुळे घरातील सर्व जबाबदारी माझ्यावर होती. अशाच खूपवेळा लग्नाचा विचार मनात येवूनही, मी लग्न करू नाही शकले. खूप कमी वयात मी कामाला सुरुवात केली. कामही भरपूर होत. विचार केला आधी भावंडांना मार्गी लावू, त्यांनतर लग्नाचा विचार करू. त्यांनंतर बहिणीच लग्न झालं, त्यांची मुले झाली. त्यांना सांभाळलं आणि यातच लग्नाची वेळ निघून गेली.”

पुढे लता मंगेशकर म्हटल्या की, “माझ्या भावंडांसाठी मी आई वडील अशा दोन्ही भूमिका पार पाडल्या. मी त्यांच्यावर कधीच चिडले नाही. आम्ही सांगलीमध्ये मोठ्या घरात रहायचो. आमच्या वडिलांनी ते घर बांधल होत. मात्र, आम्ही भावंड कधीच भांडलो नाही.” असे त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

लता मंगेशकर यांना सुरुवातीला बऱ्याच लोकांनी त्यांचा आवाज पातळ व कमकुवत असल्याने त्यांना नाकारलं होत. त्यांचा आवाज पातळ आहे असे म्हणणारे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता एस. मुखर्जी होते. एकदा लतांचे गुरू गुलाम हैदर साहिब यांनी दिलीप कुमार आणि कामिनी कौशल स्टारर फिल्म ‘शहीद’ साठी त्यांचा आवाज एस मुखर्जींना ऐकवला.

दरम्यान, प्रथम त्यांचे गाणे लक्षपूर्वक ऐकून सांगितले की, त्यांचा आवाज खूप पातळ आहे. त्यामुळे आपण त्यांना चित्रपटात काम देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, लता मंगेशकर त्यांच्या ट्यूनमध्ये खंबीर होत्या. त्या प्रत्येकाच्या चुकांवरून शिकल्या आणि जगात स्वत: चे नाव कमावले.