अबब! विकी आणि कतरिनाच्या लग्नात होणार इतका खर्च! होणार लाखो रुपयांची उधळण…

सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील या हंगामाचा फायदा घेताना दिसत आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये एका मोठ्या लग्नाची चर्चा होताना दिसत आहे. हे लग्न आहे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ या बहुचर्चित जोडीचं. या दोघांच्या विवाह सोहळ्याची तारीख आता जवळ येत चालली आहे. त्यामुळे या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी या दोघांचेही चाहते फार उत्सुक झाले आहेत.

विकी आणि कतरिनाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्यात हे दोघे लग्न करणार आहेत. त्यामुळे दोघांच्याही घरी लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. या दोघांच्याही लग्नाच्या बाबतीत बरीच गुप्तता पाळली गेली असल्याने लोकांसमोर येणारा प्रत्येक अपडेट हा खूप मोलाचा ठरत आहे. अशातच या दोघांच्या लग्नाच्या व्हेन्यूची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

हे लग्न अर्थातच थाटामाटात पार पडणार आहे. त्यासाठी पैसाही तेवढाच सढळ हस्ते खर्च केला जाणार आहे. या दोघांचं हे लग्न राजस्थान मधील सवाई माधोपूर येथे होणार आहे. तेथील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या लग्नासाठी या हॉटेल मध्ये राजा मानसिंह आणि राणी पद्मावती हे दोन स्वीट (Suite) बुक करण्यात आलेले आहेत. या स्वीट्सचं एका दिवसाचं भाडं तब्बल ७ लाख रुपये इतकं आहे. या हॉटेल मध्ये याव्यतिरिक्त ४ लाखांचे १४ स्वीट्स असून इतर रूम्सचं एका दिवसाचं भाडं १ लाख रुपये आहे. या रूम्सना गार्डन आणि स्विमिंग पूल जोडलेला आहे.

विकी आणि कतरिना राहत असलेल्या स्वीट्सच्या खिडक्यांमधून समोर अरवली पर्वत दिसतो. या लग्नासाठी हॉटेलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दोघेही ६ डिसेंबरला चेक-इन करणार असून ११ डिसेंबरला चेक-आऊट करणार आहेत. ७ डिसेंबरला या जोडीचा संगीत सोहळा पार पडेल. तर ८ डिसेंबरला मेहंदी सोहळा पार पडणार असल्याचे कळते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

या लग्नाची जबाबदारी डेको इव्हेंट्सला देण्यात आली आहे. याशिवाय या लग्नातील इतर काही जबाबदाऱ्या सहा वेगवेगळ्या व्हेंडर्सना सोपवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये फ्लॉवर अरेंजमेंट, डेकोरेशन, ट्रान्सपोर्टेशन, सिक्युरिटी, जेवण आणि जंगल सफारी यांचा समावेश आहे. एकूणच लग्नाची तयारी फार जंगी पद्धतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या लग्नासाठी कोण कोण उपस्थित राहणार आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.