लग्नात परफॉर्म करण्यासाठी बॉलिवूड स्टार्स घेतात इतके मानधन! आकडा वाचून धक्का बसेल…

अलीकडेच एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अभिनेता सलमान खानने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. त्यावरून या सिनेकलाकारांना अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे किती मानधन मिळत असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगू लागली. बॉलिवूड सेलिब्रेटी हे अशा समारंभांना हजेरी लावण्याचे तसेच अशा कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्याचे तगडे मानधन घेताना दिसतात. हल्ली मोठमोठ्या लोकांच्या लग्नात सेलिब्रेटीजना डान्स परफॉर्मन्स सादर करण्यासाठी बोलावले जाते. या परफॉर्मन्सचे त्यांना चांगले पैसे मिळतात. शिवाय त्यांची लोकप्रियताही टिकून राहते.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार अशा कार्यक्रमांना हजेरी लावत लग्नसमारंभात परफॉर्म करताना दिसतात. त्यांच्या या विशेष उपस्थितीमुळे पाहुण्यांचे मनोरंजन होते. शिवाय या कलाकारांना आपल्या फॅन्सना देखील भेटायची संधी मिळते.

कतरिना कैफ: सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरिना कैफ. अलीकडेच कतरिनाने अभिनेता विकी कौशल सोबत लग्नगाठ बांधली. कार्यक्रमांमध्ये आपल्या अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी कतरिना अशा कार्यक्रमांसाठी ३.५ कोटी इतके तगडे मानधन आकारताना दिसते.

शाहरुख खान: किंग खानचे वय झाले असले तरी त्याची जादू अजूनही कमी झालेली नाही. तो अशा कार्यक्रमांमध्ये परफॉर्मन्स देण्यासाठी एका कार्यक्रमाचे ३ कोटी रुपये मानधन घेतो.

अक्षय कुमार: खिलाडी कुमारचे वर्षभरात किमान ३ ते ४ चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात. याशिवाय तो या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी वेगवेगळ्या रिऍलिटी शोज मध्ये हजेरी लावताना दिसतो. एवढ्या सगळ्यांतूनही तो विविध कार्यक्रमांना हजेरी लावत परफॉर्मन्स सादर करत असतो. अक्षय आपल्या एका परफॉर्मन्ससाठी २.५ कोटी इतके मानधन आकारताना दिसतो.

प्रियांका चोप्रा: आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव गाजवणारी देशी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स मध्ये बिझी आहे. मात्र संधी मिळताच ती विविध कार्यक्रमांमध्ये देखील परफॉर्मन्स देताना दिसते. अशा कार्यक्रमांमध्ये परफॉर्मन्स सादर करण्याचे ती अडीच कोटी रुपये घेते.

सलमान खान: दबंग खान सलमानला पाहण्यासाठी अनेक तरुणी उत्सुक असतात. अशावेळी जर तो तुमच्या लग्नातच आला, तर तरुणींचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्याचे केवळ एक झलक मिळवण्यासाठी पोरी वेड्या होतात. असा हा सलमान खान कार्यक्रमांमध्ये डान्स करण्याचे २ कोटी रुपये मानधन घेतो.

काय मग मंडळी, आकडा वाचून धक्का बसला ना? कलाकारांना चित्रपट आणि जाहिरातींव्यतिरिक्त अशा कार्यक्रमांमधूनही तगडे मानधन मिळताना दिसते. यामुळे त्यांची लोकप्रियता टिकून राहते.