‘८३’ चित्रपटासाठी कपिल देव यांनी घेतले इतके मानधन! आकडा ऐकून धक्का बसेल…

भारतीय क्रिकेट संघ गेली अनेक वर्षं क्रिकेट खेळत आहे. मात्र सुवर्णाक्षरांत लिहून ठेवावा असा क्षण आला तो १९८३ मध्ये. १९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकप मध्ये भारतीय क्रिकेट संघ केवळ अंतिम फेरीत धडक मरून थांबला नाही, तर अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करत पहिला वहिला वर्ल्डकप देखील जिंकला. क्रिकेटच्या इतिहासात हा क्षण फार महत्त्वाचा आणि त्यामुळेच भारतीयांसाठी खूप अभिमानाचा होता. या विजयाचे श्रेय जाते ते त्यावेळेचे भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन कपिल देव यांना.

याच विजयगाथेवर आधारीत चित्रपट आला आहे ‘८३’. या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंगने केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे. चित्रपटात रणवीर सोबत दीपिका पदुकोणही कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली आहे. याशिवाय चित्रपटात सुनील गावसकरांच्या भूमिकेत ताहीर राज भसीन, यशपाल शर्मांच्या भूमिकेत जतीन सरना, मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकिब सलीम, रवी शास्त्रींच्या भूमिकेत धैर्य करवा, के. श्रीकांत यांच्या भूमिकेत जीवा, मदन लाल यांच्या भूमिकेत हार्डी संधूबलविंदर सिंग यांच्या भूमिकेत एमी वर्क, सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत साहिल खट्टर, संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग पाटील, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, कीर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा, रॉजर बिन्नी यांच्या भूमिकेत निशांत दहिया आणि टीम मॅनेजर पीआर मानसिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी अशा कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.

‘८३’ चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक समीक्षकांनी हा चित्रपट ते जुने क्षण पडद्यावर अक्षरशः जिवंत करतो असे सांगितले आहे. हा जिवंत अनुभव देण्यासाठी चित्रपटाचे कलाकार १९८३ मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाला भेटले होते. या सर्व क्रिकेट खेळाडूंना त्यांचे मानधन देण्यात आले होते. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, चित्रपट बनवण्याआधी विषयाचे अधिकार आणि खेळाडूंच्या वैयक्तिक कहाण्या मिळवणं गरजेचं होतं. कारण चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. त्यामुळे निर्मात्यांनी १९८३ वर्ल्डकप विजेत्या टीमला १५ कोटी रुपये दिले. यातील सर्वाधिक रक्कम कपिल देव यांना मिळाली आहे. कपिल देव यांना तब्बल ५ कोटींचे मानधन देण्यात आले आहे.

रेड सी फिल्म फेस्टिवल मध्ये जेव्हा या चित्रपटाचा प्रीमियर करण्यात आला, त्यावेळी रणवीर सिंग, कबीर खान आणि कपिल देव आपली पत्नी रोमीसह उपस्थित होते.