लग्नसमारंभांना हजेरी लावण्यासाठी बॉलिवूड स्टार्स घेतात इतके मानधन! आकडा वाचून धक्का बसेल…

सध्या सगळीकडेच लग्नसमारंभाचा माहौल आहे. मोठमोठी मंडळी अशा समारंभांवर पाण्यासारखा पैसा खर्च करताना दिसतात. अगदी महागडी हॉटेल्स ते उंची प्रकारचं स्वागत, सगळाच तामझाम अशा सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो. अलीकडे अशा सोहळ्यांमध्ये बॉलिवूड स्टार्सना बोलावण्याचे प्रकारही वाढत चालले आहेत. हे स्टार्स अशा कार्यक्रमांना एकतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावताना दिसतात, तर कधी ते अशा कार्यक्रमांमध्ये डान्स सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवतात. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय पटेलच्या लग्नाला अभिनेता सलमान खान उपस्थित राहिलेला पाहायला मिळाला. आपल्या अशा उपस्थितीसाठी हे कलाकार तगडं मानधन स्वीकारतात.

कतरिना कैफ: कतरिना एक उत्तम डान्सर आहे. खासगी कार्यक्रम, लग्नसमारंभ अशा ठिकाणी उपस्थिती लावण्यासाठी ती तब्बल ३.५ कोटी रुपये मानधन आकारते. हे मानधन सर्वांत जास्त आहे.

शाहरुख खान: किंग खान अशा कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी ३ कोटी रुपये मानधन आकारतो.

अक्षय कुमार: खिलाडी कुमार सध्या बॉलिवूड मधील सर्वांत व्यस्त कलाकारांपैकी एक असला तरी तो खासगी समारंभांना आवर्जून जातो. त्यासाठी तो २.५ कोटी मानधन आकारतो.

प्रियांका चोप्रा जोनास: आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका कार्यक्रमाचे २.५ कोटी मानधन घेते. अलीकडेच तिने उदयपूरमध्ये ईशा अंबानीच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.

सलमान खान: सलमान स्वतःच एक ब्रँड असल्याने तो अशा कार्यक्रमांसाठी २ कोटी रुपये आकारतो.

रणबीर कपूर: रणबीर एका कार्यक्रमासाठी २ कोटी रुपये मानधन घेतो.

रणवीर सिंग: उत्साहाचा खळखळता झरा म्हणजे रणवीर. आपल्या उत्साहाने कार्यक्रमातील लोकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रणवीर १ कोटी मानधन आकारतो.

दीपिका पदुकोण: दीपिका देखील आपल्या कार्यक्रमांमधील उपस्थितीचे १ कोटी रुपये मानधन घेते.

अनुष्का शर्मा: अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठी सर्वांत कमी मानधन घेणारी अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. ती एका कार्यक्रमाचे ८० लाख रुपये घेते.

काय मग मंडळी, बसला ना धक्का? चित्रपट आणि जाहिरातींव्यतिरिक्त हे कलाकार अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावून देखील आपली कमाई करताना दिसतात. जेवढा मोठा कार्यक्रम, तेवढा मोठा कलाकार. जेवढा मोठा कलाकार, तेवढे मोठे त्याचे मानधन. त्यामुळे अनेक कलाकार अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावताना दिसतात. तुमच्या आवडत्या कलाकारांबद्दल अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया पेजेसना नक्की फॉलो करा.