“लठ्ठ आणि जाड” दिसणारी अम्मा एकेकाळी हुरपरी पेक्षाही सुंदर दिसायची….पहा सोशल मीडियावर तिचे फोटो….

मित्रहो माणूस जसा दिसतो तो तसाच असतो असे नाही, त्याच्या भूतकाळात अनेक गोष्टी घडून गेलेल्या असतात. पण आपण वर्तमानावर जास्त विश्वास ठेवतो त्यामुळे आपण समोर दिसत असलेल्या व्यक्तीला जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला वाटते की आधीपासूनच अशी दिसत असावी. मात्र तसे नसते……काही वेळा परिस्थिती नुसार स्थिती तर बदलतेच शिवाय आपली शरीरयष्टी देखील बदलते. आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल माहिती घेणार आहोत जिच्या तरुनपणातील फोटोनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे फोटो सर्वत्र व्हायरल होत असून त्याची भलतीच चर्चा सुरू आहे.

या फोटोमध्ये झळकत असलेली अभिनेत्री आहे आपल्या सर्वांची लाडकी आणि कॉमेडी क्वीन असलेली अम्मा. त्यांचे खरे नाव सोमा राठोड हे आहे, सोमा खूपच सुंदर अभिनय साकारतात. आजरव त्यांनी अनेक विनोदी भूमिका निभावून रसिकांना खळखळून हसवले आहे. त्यांच्या उत्तम आणि विनोदी अभिनयामुळे लोक त्यांना खूप पसंत करतात, त्यांची सर्वत्र स्तुती करतात. अभिनय क्षेत्रात त्यांची एक विशेष ओळख निर्माण झाली असून, अनेक रसिक मंडळी त्यांच्या कलेचा आदर करून त्यांना मान देतात.

सोमा यांचा लठ्ठपणा कधीच त्यांच्या अभिनयाच्या आड आला नाही, त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर आपल्या लठ्ठपणा वर मात करून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. प्रत्येक वेळी त्या वेगवेगळ्या शोमध्ये, वेगवेगळ्या भूमिकेत दिसतात. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचे चाहते देखील त्यांची नवी भूमिका पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. लठ्ठ असल्यामुळे अनेकदा त्यांनी कॉमेडी शोमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अनेक विनोदी भूमिका प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाल्या आहेत.

त्यांनी बऱ्याचदा “जिजा जी छत पर है”, “आय कम इन मॅडम”,” लपटगंज” यांसारख्या विनोदी मालिकेत भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाने या मालिकांना त्यांनी लोकप्रिय बनवले आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा खूप लोकप्रियता लाभली असून त्यातून त्यांना पैसे सुद्धा भरपूर मिळाले आहेत. सोमा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात, शिवाय आता त्यांच्या जुन्या फोटोंमुळे त्या पुन्हा प्रचंड चर्चेत आल्या आहेत. या फोटोना सोशल मीडियावर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहे.

सोमा यांचे अनेक चाहते त्यांचे हे सुंदर फोटो पाहून थक्क झाले आहेत, त्यांचा विश्वास बसत नाहीये. त्यामुळे सोमा यांचे खूप कौतुकही होत आहे. जो कोणी हे फोटो पाहतो तो आधी चकित होऊन जातो, त्यामुळे अनेकजण या फोटोंवर छान छान कमेंट्स सुद्धा करत आहेत. सोमा यांनी आजवर आपल्या अभिनयातून रसिकांचे मनोरंजन केले आहे, पुढेही त्यांनी असेच मनोरंजन करावे ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.