‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाचा मुलगा पाहिला का? ‘स्वतःच्या मेहनतीने पुढे जाणार…’

छोट्या पडद्यावर ‘रामायण’ या मालिकेने इतिहास घडवला आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे लोकप्रिय ठरलेली आहेत. या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार देखील तितकेच लोकप्रिय झाले. या मालिकेत रामाची भूमिका केली होती अभिनेते अरुण गोविल यांनी साकारली होती, तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलीया पाहायला मिळाली होती. लक्ष्मणाची भूमिका साकारली होती अभिनेते सुनील लाहिरी यांनी. फार कमी लोकांना हे माहीत आहे, की त्यांचा मुलगा देखील याच क्षेत्रात कार्यरत आहे.

सुनील लाहिरींच्या मुलाचे नाव क्रिश लाहिरी आहे. अलीकडेच तो एका म्युझिक अल्बम मध्ये दिसला होता. त्याआधी त्याने ‘पीओयू: युद्ध के बंदी’ या वेब सिरीज मध्ये अयान खान ही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यालाही आधी छोट्या पडद्यावर काम करण्यात रस नव्हता. मात्र आता त्याला वेब सिरीजमध्ये काम करायचे असल्याचे त्याने सांगितले. अभिनयाच्या बाबतीत क्रिश रणवीर सिंगला आपला आदर्श मानतो. क्रिशला निगेटिव्ह भूमिका करायची आहे. निगेटिव्ह भूमिका केल्याने अभिनय कौशल्यं सुधारतात, असे क्रिशचे म्हणणे आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KRISH PATHAK (@krishhpathak)

क्रिशला अभिनयापेक्षा दिग्दर्शनात जास्त रस आहे. ‘परवरीश: कुछ खट्टी कुछ मिठी’ या मालिकेसाठी त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक शॉर्ट फिल्म्सचे दिग्दर्शन केले आहे. आताही त्याला दिग्दर्शनात आपले नशीब अजमावायचे आहे. क्रिशचे स्वप्न आहे, की त्याला निखिल अडवाणी, अनुराग कश्यप, करण जोहर अशा दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे.

खरंतर क्रिशचे वडील सुनील लाहिरी यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामुळे आपल्या मुलाला इंडस्ट्रीमध्ये लाँच करणं त्यांच्यासाठी फारसं अवघड नव्हतं. मात्र क्रिशने तो मार्ग अवलंबला नाही. त्याचं म्हणणं आहे, की त्याला इंडस्ट्रीमध्ये जे नाव कमवायचं आहे ते स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःच्या हिमतीवर कमवायचं आहे. त्याला आपल्या मेहनतीने स्वतःचे नाव मोठे करण्यात जास्त रस आहे.

एका मुलाखतीत त्याने सांगितले, की वडिलांच्या प्रोडक्शन हाऊस तर्फे एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाल्यास त्याला नक्की त्यांच्यासोबत काम करणे आवडेल. काम करण्याच्या बाबतीत क्रिश आपल्या वडिलांचा सल्ला मानतो. तो म्हणतो, की त्याच्या वडिलांचेच म्हणणे आहे की स्वतःच्या हिमतीवर पुढे जा आणि मेहनत करून नाव मिळव.

क्रिशच्या चाहत्यांना क्रिशच्या नव्या प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे. लवकरच या देखण्या अभिनेत्याला एका चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम करताना पाहता येईल अशी आशा करायला हरकत नाही.