सोनाक्षी सिन्हा होणार सलमान खानच्या कुटुंबाची सून! कोण असणार तिचा जीवनसाथी?

‘सलमान खानचे लग्न कधी होणार?’ हा एक जागतिक प्रश्न बनला आहे. सलमानचे चाहते सलमानचे लग्न व्हावे म्हणून युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. रोज नव्या अभिनेत्री बरोबर सलमानचे नाव जोडले जायचे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर तेज यायचे. सलमान आज लग्न करेल, उद्या लग्न करेल असे त्यांना वाटत राहायचे. मात्र या बातम्या खोट्या आहेत हे समजल्यानंतर त्यांचा बराच हिरमोड होऊन जायचा.

आता एक नवीच बातमी समोर येत आहे. सोनाक्षी सिन्हा आता सलमान खानच्या कुटुंबाची सून होणार असल्याची बातमी येऊ लागली आहे. ही बातमी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आता सोनाक्षीचे लग्न कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सलमान खानच्या घरात आता केवळ सलमानचेच लग्न व्हायचे राहिले आहे. त्यामुळे सलमान आणि सोनाक्षीचे लग्न होणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मात्र असे काही नाही. सोनाक्षीचे लग्न हे सलमानचा भाऊ सोहेल खान याच्या मेहुण्याशी होणार आहे. सोनाक्षी सिन्हा गेले अनेक दिवस सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदेव सोबत रि’लेशन’शिप मध्ये आहे. त्यामुळे सोनाक्षी आणि बंटीचे लग्न होणार आहे. हे लग्न झाल्यानंतर सोनाक्षी सलमान खानच्या कुटुंबाचाच एक भाग बनेल. आता हे लग्न कधी, कुठे आणि कसे होणार याबाबत अजून कोणतीच माहिती उपलब्ध झालेली नाही.

सोनाक्षीच्या लग्नाच्या बातमीमुळे तिचे चाहते खूष आहेत. सोनाक्षीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सलमान खान सोबत ‘दबंग’ फ्रॅन्चायजी मध्ये काम केल्यानंतर तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. तिने त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. लूटेरा, रावडी राठोड, हॉलिडे, सन ऑफ सरदार, मिशन मंगल, जोकर, बुलेट राजा, आर… राजकुमार, हॅप्पी फिर भाग जाएगी, तेवर, ऍक्शन जॅक्सन, अकिरा, कलंक, भुज अशा चित्रपटांमधून कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिकांमध्ये तिने रंग भरले आहेत.

सोनाक्षीने ‘लिंगा’ (२०१४) चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने अनेक चित्रपटांमध्ये बरेच आयटम सॉंग्स देखील केले आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सोनाक्षी खूप जाड होती. मात्र अभिनयसृष्टीत पदार्पण करण्यासाठी तिने आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं. त्यामुळे तिच्या डान्समध्ये एक ग्रेस आहे. सोनाक्षीने काही चित्रपटांमधील गाण्यांसाठी पार्श्वगायन देखील केले आहे.