गुलाबी सोनाली! हॉट अंदाजात सोनाली कुलकर्णीने दाखवला आपला जलवा…पहा फोटो

छोटी सोनाली अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या लग्नामुळे, तर कधी मंगळसूत्रामुळे. कधी तिच्या नजाकत भऱ्या डान्समुळे, तर कधी भन्नाट अभिनयामुळे. सोनालीच्या सगळ्याच गोष्टींची चर्चा होताना दिसते. आता देखील ती अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. सोनाली सोशल मीडिया वर नेहमीच सक्रीय असते. आपले वेगवेगळ्या अंदाजातले फोटो ती नेहमी सोशल मीडिया वर शेअर करताना दिसते.

आता देखील तिने आपले काही फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. या फोटोंमधील गुलाबी ड्रेस मध्ये ती खूपच रॉकिंग आणि हॉट दिसत आहे. या आऊटडोअर फोटोशूटमध्ये तिचे सौंदर्य खूपच उठून दिसत आहे. एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी हे फोटोशूट करण्यात आले होते. गुलाबी रंगाच्या तिच्या ड्रेसला साईड स्लिट आहे जो तिला खूपच शोभून दिसत आहे. हातात घड्याळ, कानात मोठे कानातले, हलकासा मेकअप आणि मोकळे सोडलेले केस यामध्ये तिच्या सौंदर्याला चार चाँद लागलेले दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ‘तुझ्या सौंदर्याचं सिक्रेट काय आहे?’ असे एका चाहतीने विचारले आहे. एका नेटकऱ्याने सोनालीला ‘क्विन ऑफ पिंक’ असा किताब देऊन टाकला आहे. ‘तू खूप सुंदर हसतेस’, ‘स्टनिंग’ अशा कमेंट्सनी तिचा कमेंट बॉक्स भरून गेला आहे. एका नेटकऱ्याने ‘दिलखेचक अदांची उधळण चालू आहे’ अशी कमेंट केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर तिचा ‘झिम्मा’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. सोनाली बरोबर या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. सात वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या बायका आपल्या रोजच्या आयुष्यातून बाहेर पडून लंडनच्या ट्रिपला जातात. त्यांची तेथील धमाल या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

मंडळी, तुम्ही सोनालीचा हा नवीन चित्रपट पाहिला आहे का? तुम्हाला तो कसा वाटला? तसेच तिच्या या गुलाबी रंगाच्या ड्रेस मधील दिलखेचक अदांनी तुम्हाला घायाळ केले असेल तर आम्हाला ते लगेच कमेंट मध्ये सांगा. तसेच तुम्हाला हा लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.