वाईट झालं राव! साऊथच्या ‘या’ सुपरस्टारने त्याच्या आई-वडिलांविरोधात केला गु’न्हा दाखल..

दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार थलापति विजय याने आपल्या अभिनयाच्या जादूने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र, आता त्याच्याबद्दल एक ध’क्का’दायक बातमी समोर येत आहे. त्याने अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयात स्वतःच्या पालकांविरोधात ख’टला दाखल केल्याचे वृत्त समोर आले आहे.

एवढेच नाही, तर त्याने त्याच्या पालकांसह ११ लोकांवर देखील गु’न्हा दाखल केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याचे वडील आणि दिग्दर्शक एसके चंकशेखर यांनी काही काळापूर्वी एक राजकीय पक्ष सुरू केला. या पक्षाचे इंडिया थलापति विजय मक्कल इयक्कम असे नाव आहे. या निवडणूक पक्षाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे विजयने निवेदनात म्हटले होते. या प्रकरणाची सुनावणी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही: विजय
मीडिया रिपोर्टनुसार, निवडणूक आयोगाकडे नोंदवलेल्या कागदपत्रांमध्ये विजयचे वडील या पक्षाचे सरचिटणीस आहेत आणि आई शोभा चंद्रशेखर त्याचे ट्रेजरर आहे. काही वेळापूर्वी विजयने निवेदनात म्हटले होते की, “माझा या निवडणूक पक्षाशी कोणताही संबंध नाही. मी माझ्या वडिलांच्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यास बांधील नाही.

मी चाहत्यांना आवाहन करतो की, माझ्या वडिलांच्या पार्टीत सहभागी होऊ नका. जर कोणी माझ्या नावाचा, माझ्या फोटोचा किंवा माझ्या फॅन क्लबचा गैरवापर केला तर मी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेन.”

65 व्या चित्रपटाबद्दल आहे चर्चेत
आजकाल विजय त्याच्या ६५ व्या चित्रपटासाठी चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या वाढदिवसापूर्वी, विजयने चाहत्यांना एक मेजवानी देत ​​आगामी चित्रपटाचे शीर्षक चाहत्यांमध्ये सामायिक केले होते. तसेच या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकही समोर आला होता. निर्मात्यांनी या चित्रपटाला बीस्ट असे नाव दिले आहे.

सन पिक्चर्स निर्मित, बिस्टने विजयसोबत पूजा हेगडेने मुख्य भूमिका साकारली आहे. आम्ही तुम्हाला सांगू की, विजय शेवटचा मास्टर चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे.