अप्सरेलाही लाजवतील इतक्या सुंदर आहेत ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या पत्नी! फोटो पाहून थक्क व्हाल..

एखादं सेलिब्रेटी कपल असेल तर ते लगेच प्रसिद्ध होतं. मग ते बॉलिवूड मधील असो वा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील. मात्र काही अभिनेत्यांनी आपल्या क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्रातील जोडीदार देखील निवडले आहेत. काही स्टार्सच्या पत्नी इतक्या सुंदर आहेत, की अगदी अप्सरेलाही स्पर्धा करायला लावतील. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही स्टार्सच्या पत्नींबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. चला तर मग, आज अशाच काही स्टार-पत्नींबद्दल जाणून घेऊया.

यश
‘केजीएफ’ सारख्या चित्रपटातून प्रचंड लोकप्रिय झालेलं कन्नड चित्रपटसृष्टीतील एक नाव म्हणजे अभिनेता यश. आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वाने आणि दमदार अभिनयाने या अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अभिनेत्री राधिका पंडीत बरोबर त्याची २००७ मध्ये टीव्ही मालिकांदरम्यान ओळख झाली. ‘मिस्टर अँड मिसेस रामचारी’ नंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. पुढे ऑगस्ट २०१६ मध्ये साखरपुडा करत डिसेंबर २०१६ मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले. या दोघांना दोन मुले आहेत.

रामचरण
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रचंड गाजलेलं नाव म्हणजे रामचरण. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘मगधीरा’ सारख्या चित्रपटामुळे त्याला भारतभर ओळख मिळाली. २०१२ मध्ये त्याने उपासना कामिनेनी बरोबर लग्न केले. या लग्नाची बरीच चर्चा लग्नानंतरही होत राहिली. मोठ्या धूमधडाक्यात झालेले हे लग्न सगळ्यांच्याच कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय बनून गेलं होतं.

एन. टी. रामा राव ज्युनियर
ज्युनियर एनटीआर म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता टॉलिवूडचा ‘यंग टायगर’ म्हणूनही ओळखला जातो. आपल्या ऍक्शन चित्रपटांसाठी हा अभिनेता विशेष लोकप्रिय आहे. २०११ मध्ये त्याने लक्ष्मी प्रणाथी सोबत लग्न केले. लक्ष्मी एका बिझनेसमॅनची मुलगी आहे. या दोघांना दोन मुले आहेत.

रवी तेजा
अभिनेता रवी तेजा चे खरे नाव रवी शंकर आहे. तेलगू चित्रपटसृष्टीतील या सुपरस्टारने अनेक चित्रपट केले आहेत. जेवढे त्याचे ऍक्शन चित्रपट तुफान असतात, तेवढेच त्याचे विनोदी चित्रपटही तितकेच भन्नाट असतात. २६ मे २००२ मध्ये त्याने कल्याणीशी लग्न केले. या दोघांना दोन मुले आहेत.

तर मित्रहो, तुमचे या स्टार-पत्नींबद्दल काय मत आहे? यातील किती जोड्या तुम्हाला ठाऊक होत्या? तुम्हाला यातले कोणते दाक्षिणात्य अभिनेते आवडतात? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला आमचे जे लेख आवडतात, त्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.