स्वर कोकिळा लता मंगेशकर आणि श्रद्धा कपूर यांच्या या खास नात्याबद्दल माहित आहे का? जाणून घ्या

स्वर आणि अभिनय यांच्या जोरावर आपली बॉलीवूड इंडस्ट्री दिमाखात उभी आहे. संगीताच्या दुनियेतील खास व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही. लता मंगेशकर या संगीता क्षेत्रातील अतूट तारा आहेत. जो आता निखळला आहे. भयंकर असा रोग कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावून घेतले. अख्खा भारत आज दुःखाच्या सागरात डुंबला आहे. त्यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी बडे बडे नेते, अधिकारी आणि दिग्गज कलाकार यांनी लता दीदींचा शेवटचा निरोप घेण्यासाठी आपली हजेरी लावली.

यावेळी बॉलिवूडमधील बरेच कलाकार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आणि श्रध्दा कपूरदेखील दिसले. अंतिम वेळी ती ढसाढसा रडताना दिसली. असं काय नात होते त्यांच्यामध्ये की ती इतकी भावूक झाली. असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर लता मंगेशकर या नात्याने श्रद्धाच्या आजी होत्या. असं कसं हा प्रश्नदेखील पडला असेल.. तर याचं उत्तर हे की लता मंगेशकर यांचे चुलत भाऊ हे अभिनेता शक्ती कपूर यांचे वडील होते. त्या नात्याने लताजी श्रद्धाच्या आजी होत्या.

त्यांचं हे नात बाकी आजी-नातीपेक्षा थोडंसं खास होत. शक्ती कपूर तर म्हणतात की, श्रद्धाच्या अंगी जे काही गुण आहेत त्यांचा वारसा लता दीदींकडून तिला मिळाला आहे. लता दीदी आणि श्रध्दा यांच्यातील बॉंडींग अफलातून होतं. अभिनय असो की गाणं त्या दोघींना एकमेकींची साथ पुरेशी होती. श्रद्धा आपल्याला अनेकवेळा गाणी गाताना दिसते. तिने आपले गाण्याचे हे धडे लता दिदींच्या सानिध्यात गिरवले आहेत याबद्दल शंकाच नाही.

लता दीदी आणि अभिनय यांचा काय संबंध अस म्हटलं जाईल… पण लता दीदींनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या अभिनयाने सर्वांना थक्क केले होते. प्रसंग होता लता दीदींच्या वडिलांच्या एका नाटकाचा… पंडित दीनानाथ मंगेशकर हे थोर नात्यकलावंत होते. त्यामुळे त्यांची संगीतनाटके लोक आवडीने पाहत. एकदा त्यांच्या एका नाटकात नारायणाची भूमिका करणारा कलाकार आलाच नाही म्हणून ते चिंतेत होते. ती भूमिका करण्याची संधी लता दीदींना दिसली. “मी ही भूमिका करू का?” असे विचारल्यावर वडिलांनी “तू अजून खूप लहान आहेस. तुला गायला नाही जमणार”, म्हटल्यावर “एकदा तरी काम करू द्या ना” अशी विनंती केल्यावर दिदींना नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी लता दीदी अशा गायल्या की संपूर्ण प्रेक्षकवर्ग मंत्रमुग्ध झाला. हीच देणगी लता दीदींनी श्रद्धाला दिली आहे. असं होतं श्रद्धा आणि लता दिदींच गोड नातं..