स्पृहा जोशीचा नवरा कोण आहे माहीत आहे का? तो आहे एक प्रसिद्ध पत्रकार…

‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शो चे सूत्रसंचालन करत अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्यातील अजून एक गुण दाखवून दिला. आपल्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाणारी स्पृहा एक उत्तम कवयित्री देखील आहे. २००४ मध्ये ‘माय बाप’ या चित्रपटापासून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. अग्निहोत्र (२००८) या मालिकेतील उमा बंड या भूमिकेने तिला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सिरीज अशा सगळ्याच आघाड्यांवर स्पृहाने आपली जादू दाखवून दिली आहे. समुद्र, डोन्ट वरी बी हॅप्पी सारखी तिची नाटके प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधील कुहू, ‘उंच माझा झोका’ मधील रमाबाई रानडे, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मधील ईशा अशा स्पृहाच्या सगळ्याच भूमिकांवर प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम केलं आहे.

स्पृहाच्या पतीचे नाव वरद लघाटे आहे. वरद आणि स्पृहा दोघेही सहा वर्षं रिलेशनशिप मध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. २००८ मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या नात्याने २८ नोव्हेंबर २०१४ रोजी लग्नाचे सुंदर स्वरूप धारण केले. वरदचा चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की वरद पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होता. वरद एक पत्रकार होता. एका नामांकित मराठी वर्तमानपत्रात त्याचे लेख छापून येत. मात्र पुढे पत्रकारितेच्या क्षेत्राला रामराम करत वरदने मार्केटिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. सध्या तो याच प्रोफेशनमध्ये आपले करिअर करत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Varad Laghate (@varadinsta)

स्पृहाने अभिनेत्री म्हणून नाव कमावल्यानंतर आपले कविता प्रेम जपायला सुरुवात केली. तिचा कवितासंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. तसेच तिने काही चित्रपटांच्या गाण्यांसाठी गीतलेखनही केले आहे. बावरे प्रेम हे, आस ही नवी, सांग ना या तिच्या गाण्यांना प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळतो. लहानपण देगा देवा, नेव्हर माईंड, नांदी अशा नाटकांमधील तिचं काम पाहिलं, की प्रेक्षकांच्या तिच्याकडूनच्या अपेक्षा उंचावतात.

मोरया, सूर राहू दे, अ पेइंग घोस्ट, बायोस्कोप, पैसा पैसा, लॉस्ट अँड फाऊंड, मला काहीच प्रॉब्लेम नाही, देवा: एक अतरंगी, होम स्वीट होम, विकी वेलिंगकर, अटकन चटकन अशा चित्रपटांमध्ये स्पृहाने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी स्पृहा खूप जीव ओतून काम करते. तिच्या कामांमधली विविधता चटकन दिसून येते. भूमिका कितीही छोटी असली तरी स्पृहा आपल्या अभिनयाने त्या भूमिकेला चार चाँद लावते.