श्रीवल्ली गाणे आता इंग्लिश मध्येही, हे नवीन व्हर्जन होतेय तुफान व्हायरल..ऐकून पहा….!!

मित्रहो हल्ली कोण काय करेल सांगता येत नाही, येणाऱ्या नव्या पिढीमध्ये खूपशा आगळ्यावेगळ्या कला आहेत. बॉलिवूड मधील अनेक चित्रपट शांततेच्या काळानंतर आता आपल्या भेटीस येत आहेत, तसेच नुकताच प्रदर्शित होऊन प्रेक्षकांचे भान हरपून टाकणारा चित्रपट “पुष्पा द राईज” भलताच चर्चेत आला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन किती दिवस झाले तरीही त्याची चर्चा मात्र रोज नव्याने होत असते. शिवाय यातील प्रत्येक डॉयलॉग म्हणत अनेक नेटकरी निरनिराळ्या रिल्स बनवत आहेत.

सोशल मीडियावर पुष्पा चित्रपटातील प्रत्येक संवाद, डॉयलॉग प्रसिद्ध झाला असून त्यातील सगळ्या गोष्टींची विशेष चर्चा होत आहे. मग त्यातील स्टंट असो किंवा, डान्स असो तसेच त्यातील एक गाणे “श्रीवल्ली……” हे तर आजकाल अनेकांच्या ओठांवर तरंगत आहे. हल्ली अनेकजण हे गाणे गुणगुणत असतात, सोशल मीडियावर या गाण्याचे अनेक रिल्स पाहायला मिळतात. शिवाय आता तर या गाण्याचे इंग्रजी व्हर्जन देखील व्हायरल होत आहे.

हे इंग्रजी व्हर्जन या आधीच्या गण्याचाच रेफरन्स घेऊन तयार करण्यात आले आहे, thaggedele 2021.या इंस्टा अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामधील हा ऑडिओ अगदी ओरिजनल आहे, त्यामुळे ऐकताना कोणीही रसिक, श्रोता अगदी मंत्रमुग्ध होऊन जाईल. श्रीवल्ली हे गाणे कोणत्याही व्हर्जन मध्ये छानच वाटते ऐकायला, या गाण्याचे बोल, संगीत मनाला भुरळ घालते.

View this post on Instagram

A post shared by Pushpa Raj (@thaggedele2021)

“पुष्पा…” या चित्रपटातील भरपूर गोष्टी लोकप्रिय झाल्या आहेत, खास करून यातील सर्व कलाकार आणि त्यांचा अभिनय रसिकांना वेड लावत आहे. हा दाक्षिणात्य चित्रपट अगदी बॉलिवूड वर देखील आपली जादू करत आहे. तसेच हे साऊथ गाणे “श्रीवल्ली” हिंदी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहे आणि आता याचे इंग्रजी व्हर्जन सुद्धा खूपच लक्षवेधी आहे. यातील आवाज सुद्धा सहज ओठांवर गाणे रुळवणारा आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे, त्यामुळे अद्याप नेटकऱ्यांच्या नजरेत आलेला नाही. पण हे इंग्रजी बोल आणि श्रीवल्लीचे गाणे नक्कीच रसिकांना पुन्हा एकदा वेडावून सोडेल. मित्रहो तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ एकदा नक्की पहा. तसेच आमचा आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.