खऱ्या जीवनात या दिग्गज घराण्याची सून आहे ‘अग्गबाई सुनबाई’ मालिकेतील शुभ्रा..पहा

झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी ‘अग्गबाई सुनबाई’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. मात्र, आता झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका बंद होणार आहेत. अग्गाबई सुनबाई’ ही मालिका देखील बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. झी मराठीने ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेचा सिक्वल काढून ‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली.

छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले होते. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, बबड्या, शुभ्रा, अनुराग या सर्व पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत एक नवा चेहरा शुभ्राच्या भूमिकेत पाहायला मिळाला. या शुभ्राची भूमिका “उमा ऋषिकेश” या अभिनेत्री साकारली आहे. उमा ऋषीकेशने आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, तुम्हाला तिच्या वयक्तिक आयुष्याबद्दल माहीत आहे का?

उमा ऋषिकेश” या अभिनेत्रीन अग्गबाई सुनबाई या मालिकेपूर्वी ‘स्वामिनी’ या लोकप्रिय मालिकेतून उमाने पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. एसएनडीटी महाविद्यालयातून उमाने एमएची पदवी प्राप्त केली आहे. याव्यतिरिक्त कथ्थक आणि नाट्य संगीताचे प्रशिक्षण देखील तिने घेतले आहे. अद्वैत दादरकारचे आई-वडील शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिने नाट्य संगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

प्रशांत दामलेंकडून उमाला हा पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे पहिले-वहिले नाटक मिळाले. उमा ऋषिकेश हिचे पूर्ण नाव आहे “उमा ऋषिकेश पेंढारकर” प्रसिद्ध गायक, नाट्य दिग्दर्शक ज्ञानेश पेंढारकर हे तिचे सासरे तर प्रसिद्ध नाट्य कलाकार, गायक भालचंद्र पेंढारकर यांची ती नातसून होय. उमाचा नवरा ऋषिकेश पेंढारकर हे आर्किटेक्ट आहेत. अभिनयापासून तो दूरच आहे पण सेटवर अनेकदा हजेरी लावताना पाहायला मिळतो.

‘अग्गबाई सुनबाई’ या मालिकेत उमा ऋषिकेशने अतिशय सोज्वळ मुलीची भूमिका साकारली आहे. तिचा स्वभाव अत्यंत शांत आणि स्वाभिमानी दाखवला आहे. ती तिच्या प्रत्येक मालिकेत अगदी चोखपणे भूमिका पार पाडत असते. ती दिसायला देखील प्रचंड सुंदर आहे तशीच हुशार देखील आहे.