सुनिल शेट्टीची पत्नी समाजसेवक? जाणून घ्या काय करते सुनिल शेट्टीची पत्नी..

बॉलीवूडमधील अनेक लोक समाजसेवा करतात. काहीजण लाईमलाईटमधे येण्यासाठी तर काहीजण आपला मागचा रेकॉर्ड क्लिअर करण्यासाठी दान धर्म करत राहतात. पण काहीजण स्वतःला लाइमलाइटपासून दूर ठेवूनही निस्वार्थ भावनेने समाजसेवा करतात. अभिनेता सुनिल शेट्टी याची पत्नी माना शेट्टी ह्याला अपवाद ठरत सध्या त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक कर्तृत्वामुळे चर्चेत आल्या आहेत. तर जाणून घेऊया माना शेट्टी यांचा प्रवास..

अभिनेता सुनिल शेट्टी हा आजही अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याच्या हेरा फेरी या चित्रपटावर आजही लाखो मिम्स व्हायरल होताना दिसतात. हेरा फेरी हा चित्रपट मिमकरांसाठी एक विद्यापीठ बनले आहे. त्याच्या धडकन या चित्रपटाची गाणी आजही अनेकांच्या ओठांवर रेंगाळत असतात.

अनेक चित्रपटांतून त्याने उत्तम अभिनय तर केलाच आहे पण त्यानंतरची कारकीर्ददेखिल सुनिल शेट्टी याने व्यावसायिक क्षेत्रात घवघवीन यश मिळवून उजळवून टाकली आहे. तो एक अत्यंत यशस्वी उद्योगपती आहे. त्याची वार्षिक कमाई जवळपास १०० कोटी इतकी आहे. पण हे शक्य झाले आहे माना शेट्टी यांच्यासारख्या समजूतदार जोडीदारामुळेच!

१९९१ मध्ये अभिनेता सुनिल शेट्टी याने माना शेट्टी हीच्याबरोबर जन्मगाठ बांधली. याआधी त्या दोघांनी एकमेकांना पूर्णपणे समजून घेण्यासाठी बऱ्याच काळासाठी डेट केले होते. पण त्यानंतर त्यांनी लग्न केले आणि आजही ते सुखाचा संसार करत आहे. एका स्त्रीने फक्त तिच्या नवऱ्याच्या ओळखीवर न जगता स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायला हवी. नेमके हेच माना हीने केले आहे.

सुरुवातील माना यांनी काही चित्रपटात काम केले पण त्यानंतर त्यांनी उत्तम गृहीणीची भूमिका पार पाडली. आजही पार पाडत आहेत. माना शेट्टी या व्यवसायात पण उतरल्या. त्यातही त्यांनी उत्तम काम केले. त्या आपल्या नवऱ्याबरोबर एस टू नावाचा प्रोजेक्ट चालवतात. या प्रकल्पाअंतर्गत माना यांनी तब्बल २१ लक्झरी व्हिला उभारले आहेत. खरोखर त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाला आणि कार्याला दाद द्यावी लागेल.

फक्त व्यवसायातच नाही तर सामाजिक क्षेत्रातही माना यांनी भरीव कामगिरी केली आहे. सेव्ह द चिल्ड्रेन या प्रकल्पाअंतर्गत माना ही फंड गोळा करत असते आणि तो फंड आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या किंवा दुर्धर परिस्थिती असलेल्या मुलांसाठी वापरते. हे सर्व माना लाइमलाइटपासून दूर राहून करत असते, हे कौतुकास्पद आहे. अनेक सामाजिक आणि सेवाभावी संस्थांसाठी माना शेट्टी मनोभावे काम करत असतात.

माना यांचा वाढदिवस पुढील महिन्यात आहे. अर्थात २२ अॉगस्ट रोजी आहे. यावेळी त्यांना आपण आधीच शुभेच्छा देऊन टाकूया. कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक अशा तिन्ही क्षेत्राचा कार्यभार जबाबदारीने वाहणाऱ्या माना शेट्टी ह्या खरोखर महिलांसाठी आयडल बनल्या आहेत. त्यांना त्यांच्या आगामी कार्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हा लेख जास्तीत मित्रांपर्यंत पोहचता करा आणि पेजला लाईक करा.