चित्रपटांमध्ये सक्रिय नसून देखील राजासारखे आयुष्य जगतो सनी देओल, आहे इतक्या कोटी संपत्तीचा मालक..

बॉलिवूड इंडस्ट्रीचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल action हिरो म्हणून प्रसिद्ध आहे. सनी देओलने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. घटक, दामिनी आणि गदर या चित्रपटांसाठी तो खास करून ओळखला जातो. सनी देओलचा जन्म १९ ऑक्टोबर १९५६ रोजी झाला. तो आता ६५ वर्षाचा झाला आहे. सनी देओल अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा जे ७० च्या दशकातील सुपरस्टार होते आणि सनी देओलनेही ही परंपरा पुढे नेली. त्याच्या आईचे नाव प्रकाश कौर असून हेमा मालिनी हि सावत्र आई आहे.

सनी देओल एका फिल्मी कुटुंबातील आहे. सनी देओलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९८३ मध्ये आलेल्या ‘बेताब’ या चित्रपटातून केली होती. तो एक रोमँटिक चित्रपट होता, पण सनी देओलची फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रतिमा एक रागीट नायकाची होती. सनी देओलचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करण्यात यशस्वी झाला. सनी देओलने आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात मोठा अॅक्शन हिरो म्हणून आपला ठसा उमटवला आहे. अभिनयानंतर सनी देओलने राजकारणातही प्रवेश केला आहे. सनी देओल गुरदासपूरचे खासदार आहेत.

सनी देओल ९० च्या दशकातील एक असा अभिनेता ज्याला प्रेक्षक पाहून वेडे व्हायचे. सनी देओल गेल्या चार दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. आपल्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांनी जगभरात चांगले नाव कमावले आहे आणि ते करोडो रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

आजकाल सनी देओल चित्रपटांमध्ये क्वचितच दिसत असला तरी त्याची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. आजही जगभरात सनी देओलच्या चाहत्यांची कमतरता नाही. सध्या सनी देओल एक चित्रपट करण्यासाठी ८ ते १० कोटी रुपये घेतो. जर आपण सनी देओलच्या एकूण मालमत्तेबद्दल बोललो तर मीडिया रिपोर्टनुसार, सनी देओल सुमारे ३५० कोटींच्या मालमत्तेचे मालक आहे. अभिनेत्याच्या संपत्तीमध्ये त्याची पत्नी पूजाची कमाई देखील समाविष्ट आहे. सनी देओलचे कमाईचे स्त्रोत केवळ चित्रपट नाहीत तर त्याचे “विजता फिल्म्स” नावाचे एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त, सनी देओल जाहिरात चित्रपटांद्वारे देखील कमाई करतो. त्यासाठी तो सुमारे २ कोटी रुपये फीस घेतो. जर आपण सनी देवलच्या मालमत्तेबद्दल बोललो तर त्याच्याकडे एक अतिशय आलिशान बंगला आहे, जो मुंबईच्या जुहू भागात आहे. एवढेच नाही तर सनी देओलची पंजाबमध्ये वडिलोपार्जित संपत्ती आहे. यासह, त्याचे यूके मध्ये एक आलिशान घर देखील आहे. काही चित्रपटांचे चित्रीकरण सनी देओलच्या यूकेच्या घरीही झाले आहे.

सनी देओलला महागड्या वाहनांचाही खूप आवड आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान कार आहेत. यामध्ये पॉर्श व्यतिरिक्त ऑडी ए 8 आणि रेंज रोव्हर सारख्या लक्झरी कारचा समावेश आहे. जर सनी देओल कोणत्याही शूटिंग किंवा कार्यक्रमासाठी गेला तर तो अनेकदा पोर्श गाडी चालवताना दिसतो. तसे, सनी देओल मीडियाचे लक्ष, चित्रपट पार्ट्या आणि प्रसिद्धीपासून दूर राहतो. तो वास्तविक जीवनात खूप सौम्य आहे.

सनी देओल आपल्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य देतो. तो त्याच्या कुटुंबासह जुहू येथील एका आलिशान बंगल्यात राहतो. सनी देओल त्याच्या आईच्या खूप जवळ आहे आणि त्याला तिच्यासोबत राहणे आवडते.

सनी देओलच्या पत्नीचे नाव पूजा आहे, जी लाइमलाइटपासून दूर राहते. जरी सनी देओल चित्रपटांमध्ये कमी सक्रिय असला तरी तो भव्य जीवन जगतो आहे. त्यांना कशाचीही कमतरता नाही.