सुपरस्टार आयुष्यमान खुराणाने खरेदी केले स्वतःचे घर..मुंबईतील त्याचे हे पहिले घर सोशल मीडियावर चर्चेत….

मित्रहो बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता आयुष्यमान खुराणा हल्ली सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. याचे कारण देखील तसेच खासच आहे, तो आपल्या दमदार अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे, त्याचे सर्व चित्रपट चाहते प्रचंड आवडीने पाहतात. फार कमी वेळात त्याने भरपूर ओळख मिळवली असून अनेक लोक त्याला खूप पसंत करतात. अनेक तरुणी त्याच्यावर फिदा आहेत, तसेच पूर्ण देशभर त्याच्या अभिनयाचे कौतुक होत असते.

नुकताच आयुष्यमानने मुंबई मध्ये एक हक्काचे आलिशान घर खरेदी केले आहे. ही बाब खूप अभिमानाची आहे कारण स्वतःचे घर स्वतः खरेदी करणे खूप कौतुकाची गोष्ट असते. आपलं हक्काचं घर खूप गरजेचे असते, जिथे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. त्याने भर मुंबईत खूपच सुंदर घर खरेदी केले आहे. त्याच्या घराचे फोटो पाहून सर्व चाहते खुप खुश आहेत, अनेक लोक हे घर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

त्याचे हे घर ४ हजार २७ स्क्वेअर फूट मध्ये आकारले आहे, २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याने ९६ लाख ५० हजार देऊन घराचं रजिस्ट्रेशन केले होते. हे घर त्याने खास आपल्या कुटुंबासाठी खरेदी केले आहे, आणि आता तो लवकरच आपल्या नव्या घरी कुटुंबासोबत शिफ्ट होणार आहे. त्याच्या घराबाहेर तब्बल ४ गाड्या पार्क करण्याची जागा आहे, या घराची किंमत तब्बल १९ कोटी इतकी आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्यमानने आपण मुंबईत राहत असूनही आपल्या गावाशी असलेले नात खुप छान जपून ठेवले आहे, त्याने आपल्या गावात एक आलिशान बंगला सुद्धा खरेदी केला आहे. हा बंगला खरेदी करण्यामागे कारण असे की समस्त खुराणा परिवार नेहमीच एकत्र राहील. हा बंगला जवळपास ९ कोटींचा असून खुपच सुंदर आहे. याबद्दल बोलताना अभिनेता म्हणतो की “हा फक्त माझा न्हवे तर सर्व खुरणाजचा निर्णय आहे. सर्वांनी एकत्र यावे, राहावे सोबत वेळ घालवावा या कारणास्तव आम्ही हे घर खरेदी केले आहे”.

मुंबई मध्ये त्याचे हे नवे घर पाहण्यासाठी खूप लोक उत्सुक आहेत, त्याला या घराच्या खरेदीबद्दल खूप खूप शुभेच्छा. त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.