बॉलिवूड मधील सर्वात बोल्ड अभिनेत्री सुप्रिया, आता दिसतेय अशी! सोशल मीडियावर फोटो झपाट्याने व्हायरल…

मित्रहो बॉलिवूड मध्ये खूपशा कलाकारांनी आपल्या अदाकारीने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांची ही ओळख अगदी अजरामर झाली असून लोक वर्षानुवर्षे त्यांना नक्कीच लक्षात ठेवतील. कित्येक वर्षांपासून अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत, त्यातील काही अभिनेत्रींनी आपली खास वैशिष्ट्य आजही चर्चेत राखली आहेत. तसेच अजूनही अनेक अभिनेत्री आहेत ज्या विशेष लोकप्रिय आहेत, त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री सुप्रिया. जी आपल्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली आहे.

तिने २००७ साली प्रदर्शित झालेला चित्रपट “वेलकम” मधून भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. या चित्रपटात तिने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या मामीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. अनेकांना हसवून त्यांचे आयुष्य वाढवण्यात या चित्रपटाचा हात असावा….असे म्हणण्यास हरकत नाही. यामध्ये नाना पाटेकर, कॅटरिना कैफ, अक्षय कुमार, अनिल कपूर, परेश रावल, असे दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकले होते.

तसेच या सर्व कलाकारांमध्ये सुप्रिया सुद्धा झळकली होती, तिची भूमिका देखील खूपच लक्षवेधी ठरली होती. अभिनेत्री सुप्रिया कर्णिक हीने या चित्रपटातून भरपूर ओळख आणि लोकप्रियता मिळवली आहे. आजवर तिने शांती, तहकीकात, वो रहनेवाली महलों की, दास्तान, देवी, कानून, यांसारख्या हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. तसेच तिने “तिसरा डोळा” या मराठी मालिकेत देखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

सुप्रिया कर्णीकने परदेस, ताल, जीस देश में गंगा रहता है, राजा हिंदुस्थानी, तुझे मेरी कसम, मुझसे शादी करोगी, आर्यन, वेलकम, दे दना दन, वेलकम बॅक यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आजवर तिने जवळपास ५० हुन अधिक चित्रपटात आपला अभिनय गाजवला आहे. पण हल्ली सुप्रिया या कलाक्षेत्रात फार कमी दिसते, रुपेरी पडद्यावर तिचा वावर आता कमी झाला आहे. मात्र सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते, तिचे खुपसे फोटो पाहायला मिळतात.

ती हल्ली खूप छान दिसते, विशेष म्हणजे ती आजही अविवाहित आहे. अभिनेत्री होण्याआधी तिने टायपिस्ट, सेक्रेटरी, कार रिपेअर, शेअर मार्केट, रिअल इस्टेट, अशा अनेक क्षेत्रात काम केले आहे. तिचा जन्म मुंबईत झाला होता, तसेच तिला दोन बहिणी देखील आहेत. सुप्रिया आधीपासूनच खूप सुंदर दिसते आणि आताही ती खुप छान दिसते. तिच्या भावी आयुष्यासाठी तिला भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.