“सैराट” फेम आर्चिच्या बाबांची बायको आहे खूपच सुंदर…पहा व्हायरल फोटो.

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत सर्वात जास्त गाजलेला चित्रपट “सैराट” आजसुद्धा चर्चेत आहे. या चित्रपटाने पडद्यावर अगदी धुमाकूळ घातला होता, यातील प्रत्येक गोष्ट विशेष लोकप्रिय ठरली आहे. यातील कलाकार, त्यांचा अभिनय, संवाद यांसारख्या अनेक गोष्टी लक्षवेधी आहेत. तसेच यातील गाणी तर अगदी धुंद करतात. हा चित्रपट पडद्यावर येताच एका रात्रीत याची लोकप्रियता गगनाला भिडली होती, यातील सर्व नवखे कलाकार सुद्धा एका रात्रीतच स्टार बनले होते. आजवर कोणीही न ओळखणारे हे कलाकार अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारे ठरले.

यातील आणखीन एक भूमिका विशेष गाजली, ती म्हणजे चित्रपटाची नायिका आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिच्या वडिलांची भूमिका. ही भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी साकारली होती, एक कलाकार म्हणून ते खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या कारकीर्दीबद्दल तर माहिती समोर येतच असते, शिवाय आज आपण त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत. मित्रहो सुरेश विश्वकर्मा यांचे आयुष्य खूप गरीब परिस्थिती मध्ये गेले आहे, त्यांनी आपले जगणे सुधारण्यासाठी मुंबई मध्ये धाव घेतली.

आपल्या अभिनय कलेला सोबत घेऊन जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा त्यांनी “रेगे”, ” गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा”,”महिमा खंडोबाचा” यांसारख्या सिनेमात उत्तम भूमिका पार पाडल्या. पुढे त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या “सैराट” चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, या संधीचे त्यांनी सोने करून आयुष्य बदलवले. त्यांची भूमिका “फँड्री” चित्रपटात देखील गाजली आहे. “सैराट” मध्ये त्यांनी आर्चीच्या वडिलांची भूमिका निभावली होती, ही भूमिका काहीशी रागीट आणि काळजी असणारी आहे.

सुरेश हे आज प्रसिद्धीच्या मोठ्या टप्प्यावर आहेत, पण इथवर पोहचण्यासाठी त्यांच्या बायकोने देखील त्यांना प्रचंड साथ दिली आहे. त्यांच्या पत्नीचे नाव विद्या विश्वकर्मा असे आहे, विद्या आणि सुरेश दोघेही नेहमी एकत्र दिसतात. सोशल मीडियावर सुद्धा हे दोघे नेहमी सक्रिय असतात, अनेक चाहते त्यांना फॉलो करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा त्यांची चर्चा रंगलेली असतेच. ते दोघेही अनेकदा निरनिराळ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट खूपदा चर्चेत येतात.

विद्या नेहमी सुरेश यांना साथ देत असतात, मुंबईत आल्यावर देखील त्यांनी प्रचंड साथ दिली आहे म्हणून तर आज त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस उभे झालेले दिसतात. एक पत्नी म्हणून त्यांनी आपली सगळी कर्तव्ये पार पाडली आहेत, अगदी प्रत्येक परिस्थितीत सुरेश यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. त्यांची ही जोडी अशीच नेहमी एकत्र राहो ही सदिच्छा. या जोडीला उदंड आयुष्य लाभो.तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.