‘सुवासिनी’ मालिकेतील ही अभिनेत्री आठवते का? आता दिसते इतकी ग्लॅमरस…

छोट्या पडद्यावरच्या काही मालिका संपल्या तरी त्यातील व्यक्तिरेखा आणि कलाकार कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. विशेष करून मालिकांमधील बालकलाकार जास्त लक्षात राहतात. त्यांचं निरागस दिसणं, अगदी समरसून भूमिका निभावणं प्रेक्षकांना खूप भावतं. अशीच एक प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली मालिका म्हणजे ‘सुवासिनी’. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना फार आवडून गेलं होतं. या मालिकेतील अजून एक गोष्ट प्रेक्षकांच्या मनात राहिली ती म्हणजे या मालिकेची नायिका.

स्टार प्रवाह वाहिनी वर २०११ मध्ये ही मालिका प्रसारीत व्हायला सुरुवात झाली. या मालिकेतील छोटी सुवी सर्वांच्याच लक्षात राहिली. ही सुवी साकारली होती ऐश्वर्या तुपे या अभिनेत्रीने. ऐश्वर्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमधेय काम केलं आहे. ‘सुवासिनी’ मालिका संपून बरीच वर्षं उलटली आहेत. मात्र या छोट्या सुवीला प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. ऐश्वर्याने ही भूमिका खूप सहजपणे साकारली होती. तिचा हा छोट्या पडद्यावरचा सहजसुलभ वावर प्रेक्षकांना जास्त भावला.

आता मात्र छोटी सुवी छोटी राहिलेली नाही. ती आता मोठी झाली असून आधीपेक्षा खूप वेगळी दिसते. ‘सुवासिनी’ मालिकेत ती खूप सोज्वळ दिसत होती. आता मात्र ती फारच मॉडर्न झाली आहे. सध्या जरी ऐश्वर्या कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात दिसत नसली तरी ती सोशल मीडिया वर खूप सक्रीय असते. ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडिया वर अपलोड करत राहते. या फोटोंमध्ये आपण तिच्यात झालेला बदल पाहू शकतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aishwarya Tupe. (@aishwarya_tupe_1999)

या फोटोंमध्ये ऐश्वर्या खूपच ग्लॅमरस दिसते आहे. खरंतर तिला आता ओळखणं खूप कठीण झालं आहे. इतका तिच्यामध्ये बदल झाला आहे. मात्र हा बदल खूप चांगल्या पद्धतीने झालेला पाहायला मिळत आहे. ती आपले वेगवेगळ्या आऊटफिट मधले फोटो सोशल मीडिया वर शेअर करत राहते. यामध्ये ती कधी खूपच ग्लॅमरस, कधी हॉट, तर कधी खूपच क्यूट दिसते. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो. यावरून दिसून येतं, की प्रेक्षक अजूनही ऐश्वर्याला विसरलेले नाहीत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aishwarya Tupe. (@aishwarya_tupe_1999)

ऐश्वर्याने ‘सुवासिनी’ मालिकेत केलेले काम प्रेक्षकांना खूपच आवडून गेले. याशिवाय तिने ‘बापमाणूस’ मालिकेतही काम केले होते. मालिकांशिवाय ऐश्वर्या काही चित्रपटांमध्येही झळकली आहे. तिला खोपा, नटी आणि मोकळा श्वास या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.