स्वप्नील जोशीच्या घरी नव्या पाहुण्याचे स्वागत! खरेदी केली महागडी कार…किंमत जाणून थक्क व्हाल

अभिनेता स्वप्नील जोशीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. पुढे या क्षेत्रात आपल्या मेहनतीने स्वप्नील यशाची एक एक पायरी चढत गेला. आज तो मराठी आणि हिंदी कलाक्षेत्रातील एक अत्यंत नावाजलेला कलाकार आहे. आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये आज त्याचं नाव घेतलं जातं. मालिका, नाटक, चित्रपट यांसह स्वप्नीलने डिजिटल प्लॅटफॉर्म वर देखील नाव कमावले आहे.

स्वप्नील सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘चला हवा येऊ द्या’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. तो सोशल मीडिया वरही बराच सक्रीय आहे. आपले वेगवेगळे फोटो आणि विनोदी व्हिडिओ तो नेहमी सोशल मीडिया वर शेअर करताना दिसतो. आताही त्याने असेच काही फोटो आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. त्याच्या कुटुंबात एका नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. त्याचेच फोटो आणि व्हिडिओ त्याने सोशल मीडिया वर शेअर केले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

स्वप्नीलने नुकतीच एक नवीन कार खरेदी केली. “Puma ची गाडी आली!! The JAGUAR I-PACE all Electric !!!!! बाप्पा मोरया!” असं कॅप्शन त्याने आपल्या या पोस्टला दिलं आहे. त्याने आपल्या गाडीचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच गाडीचे उद्घाटन करतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. आपली पत्नी लीना, मुलं आणि आईवडीलांसह तो ही कार आणण्यासाठी गेला होता. त्याने एक फॅमिली फोटो देखील शेअर केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

त्याच्या या पोस्ट वर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही कमेंट्स करत स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे. भरत जाधवने ‘वा… मस्त… खुप खुप शुभेच्छा..!’ अशी कमेंट केली आहे. तर सुबोध भावेने ‘भारी आहे’ म्हणत कौतुक केले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकार श्रेया बुगडेने ‘आली रे आली’ म्हणत आपला आनंद व्यक्त केला. अंकुश चौधरीने ‘सुपररररररररररररररर भावा’ असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे. याशिवाय अमेय वाघ, मुक्ता बर्वे, रितेश देशमुख, पूजा सावंत, सलील कुलकर्णी, सोनाली खरे, प्रार्थना बेहरे, अमृता खानविलकर, सुयश टिळक, पीएनजीचे सौरभ गाडगीळ, वरुण इनामदार, पूर्वा मंत्री, आदिनाथ कोठारे, सई देवधर आदी सेलिब्रेटींनी देखील स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे.

लवकरच स्वप्नीलचा ‘बळी’ हा चित्रपट ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. यात तो बळी विधूर च्या भूमिकेत दिसेल. ९ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.