स्वर कोकिळा लता मंगेशकर यांना मारण्यासाठी देण्यात आले होते विष..३ महिने होत्या अंथरुणाला खिळून..

मित्रहो कलाविश्वातील स्वर कोकिळा लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला आहे, त्यांच्या अशा आकस्मित निधनाने अनेकांवर शोककळा पसरली आहे, आज प्रत्येक भारतीय नम्र झाला आहे. आयुष्य भर गायन करून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांनी मिळवलेली लोकप्रियता असंख्य आहे. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, १९४२ मध्ये त्यांच्या गायनाला सुरुवात झाली होती. आज त्यांचे प्रत्येक गीत रसिकांच्या कानातून थेट काळजात पोहचतो.

अशी थेट काळजाला हाक देणाऱ्या लता मंगेशकर यांच्या आयुष्यात अनेक किस्से आहेत, जुनी पिढी तर त्यांच्या गाण्याची प्रिय आहेच शिवाय हल्लीची नवी पिढी सुद्धा त्यांची गाणी खूप आवडीने ऐकतात. गायन कलेचे हृदय म्हणजे लता मंगेशकर या आहेत, त्यांनी आजवर जवळपास ५० हजार पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. अनेक भारतीय भाषांतून त्यांची गाणी आज प्रसिद्ध आहेत. भारताची ही स्वर कोकिळा २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोर मध्ये मध्यमवर्गीय मराठा परिवारात जन्माला आली होती. त्यांचे आधी नाव हेमा असे होते, मात्र जेव्हा त्या ५ वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव लता ठेवले.

परिवारात लता मंगेशकर या आपल्या भाव बहिणींच्या मध्ये सर्वात मोठ्या आहेत, त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर लता यांनी आपल्या भावंडांची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांचे वडील हे दीनदयाल रंगमंचावर प्रसिद्ध कलाकार होते, त्यांच्या मुळे लता यांना गायनाची आवड लागली होती. वारसा म्हणून मिळालेली त्यांना ही कला अनेकांच्या मनात वसवली आहे. अगदी जगभर आपल्या आवाजाने रसिकांना आपलं करणाऱ्या लता याना एके वेळी मारण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता.

१९६३ मध्ये जेव्हा त्या ” २० साल के बाद” या चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करत होत्या तेव्हा या गाण्याचे निर्देशक हेमंत कुमार यांनी पूर्ण तयारी केली होती. पण रेकॉर्डिंग च्या आधी काही तासापूर्वी लता मंगेशकर यांची तब्येत खालावली. त्यांच्या पोटात दुखू लागले, व त्यांना उलट्या सुद्धा होऊ लागल्या होत्या. दरम्यान त्यांच्या पोटात जास्तच दुखायला लागले, तेव्हा डॉक्टरला बोलावण्यात आले. यावेळी लता ३ दिवस मृत्यूला झुंज देत होत्या, १० दिवसानंतर त्यांच्या तब्येत मध्ये सुधार झाली. त्यावेळी डॉक्टरने सांगितले होते त्यांच्या खान्यातून त्यांना विष दिले गेले आहे.

हा किस्सा सांगताना लता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की तो काळ त्यांच्या साठी खूप भयाण होता, त्यावेळी जवळपास ३महिने त्या अंथरुणात होत्या. त्यावेळी त्यांना साधे चालणे देखील होत न्हवते, पण त्यांच्या कुटुंबातील डॉक्टरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. नंतर पुन्हा त्यांनी आपल्या गायनाची नव्याने सुरुवात केली. आज अनेक लोक भावुक झाले आहेत, त्यांचे जरी असे आकस्मित निधन होऊन त्यांनी निरोप घेतला असला तरीही त्यांच्या आवाजातून त्या सर्वांच्या हृदयात जिवंत राहतील.