लहानपणातच सैफ-करीनाचा मुलगा ‘तैमूर’ आहे इतक्या संपत्तीचा मालक, संपत्ती जाणून चकित व्हाल

बॉलीवूडचा उदयभान अर्थात सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि दमदार अभिनेत्री बेबो करीना कपूर (Kareena Kapoor) यांची जबरदस्त जोडी म्हणजेच सैफिना. या सैफीनाचा मोठा मुलगा आणि नवाब पतौडी खानदानाचा वारस म्हणजे प्रसिद्ध असणारा लहान वयाचा सेलेब्रिटी म्हणजे गोंडस असा तैमुर अली खान. (Taimur Ali Khan) तैमुरला त्याच्या जन्मापासूनच खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

जन्मापासूनच इतकी प्रसिद्धी खचितच कुठल्या स्टारकीड ला मिळाली असेल. तैमुरची एक झलक कॅमेऱ्यात टिपता यावी यासाठी पत्रकार खूपच धडपडत असतात. यामुळे करिना कधी कधी वैतागूनही जाते. इंटरनेटवर त्याच्या फोटो आणि व्हिडिओंना खूप आवडीने पाहिलं जातं. हे छोटे नवाब गोंडसापणामुळे प्रसिद्ध आहेतच पण अजून एक गोष्ट म्हणजे नवाब तैमुर हे तेवढेच श्रीमंत ही आहेत तर जाणून घेऊयात त्यांच्या श्रीमंतीबद्दल,

मूळचे इथले आहे पतौडी घराणे
हे पतौडी घराणे, पतौडी गावचे जिल्हा गुडगाव, हरयाणामधील आहे. १८०४ मध्ये हे घराणे नवाब म्हणून अस्तित्वात आले. यांचे मूळ ‘बरेच पश्तून’ या कंदाहार, अफगाणिस्तान मधील प्रजातीत आहे. १६ व्या शतकात हे लोक अफगाणिस्तानातून भारतात आले असावेत. तर मुहम्मद फैज तलब अली खान हे या घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात, हे पतौडी संस्थानाच्या गादीवर बसलेले पाहिले नवाब.

१९७१ मध्ये हे संस्थान भारतात विलीन करण्यात आले. तेंव्हा या संस्थानचे शेवटचे शासक हे इफ्तिकार अलीखान पतौडी म्हणजे सैफचे आजोबा होते. इफ्तिकार अली हे पतौडी संस्थानचे आठवे नवाब, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी साजिदा सुलतान या भोपाळच्या बेगम म्हणून व मन्सूर अलीखान उर्फ टायगर पतौडी हे नववे नवाब म्हणून गादीवर बसले. ते भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान होते.

खानदानी संपत्ती
सध्या सैफ हा नवाबपदी आहे. टायगर पतौडी यांची संपत्ती वारसा हक्काने सैफला मिळाली आहे. यांत खानदानी राजमहाल जो ‘पतौडी पॅलेस’ (Pataudi Palace) म्हणून प्रसिद्ध आहे. या पतौडी पॅलेस ची किंमत जवळपास ८०० कोटी ₹ इतकी असावी. तसेच तैमुरच्या नावावरही बरीच सम्पत्ती आहे. ज्यामध्ये १००० एकरची जमीन आहे, त्याची किंमत करोडो ₹ आहे. तसेच सैफची आजी बेगम साजिदा सुलतान यांना मिळालेली भोपाळमधील ही खूप संपत्ती आहे. त्याची किंमत ५००० कोटी ₹ इतकी आहे, ज्यामध्ये भोपाळचा शाही महाल आहे.

सध्या ही संपत्ती का’य’देशीर कचाट्यात सापडली आहे. सध्या सैफ व करीना ज्या मुंबईमधील घरात राहतात, त्या फॉर्च्युन हाईट्स मधील फ्लॅटची किंमत आहे ४८कोटी ₹. स्वित्झर्लंड मध्येही यांचा एक बंगला आहे ज्याची किंमत ३३ कोटी ₹ आहे. सैफची वार्षिक कमाई ५५ कोटी आहे. त्याची एकूण संपत्ती ११०० कोटी ₹ आहे. त्याच्याकडे जगातील सर्वात महागडी दुचाकींपैकी असणारी हर्ले डेव्हिडसन जिची किंमत १० लाख ₹ आहे. सैफचा नवाबी थाट दिसतो जेंव्हा दिवसाला तीन घड्याळे बदलतो, त्याला महागडी घड्याळे वापरण्याचा खूप शौक आहे.

सध्या पतौडी खानदानाच्या संपत्तीची मालकी शर्मिला टागोर (Sharmila Tagor) यांच्याकडे आहे. त्यांची थोरली मुलगी सबा व त्या दोघी मिळून या सगळ्याची देखभाल करतात. हे नवाब खानदान जवळपास २७०० कोटी ₹ इतक्या संपत्तीचे मालक आहे, असा अंदाज आहे. भरपूर हवेल्या, महाल अशी गडगंज संपत्ती आहे. शर्मिला टागोर यांच्या म्हणण्यानुसार त्यांना माहीतही नाही की नक्की त्यांची किती स्थावर-जंगम मालमत्ता आहे ते. हे आकडे ऐकून आपला नक्कीच ‘आ’ वासला गेला असेल.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.