‘तारक मेहता का…’ मधील चंपक चाचांची पत्नी पाहिली का? खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर…

२००८ मध्ये सुरू झालेली ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेली तेरा वर्षे प्रेक्षकांना हसवण्याचे काम न थकता करत आहे. त्यामुळे अर्थातच या मालिकेतल्या सगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या ओळखीच्या आणि आपुलकीच्या झाल्या आहेत. गोकुलधाम सोसायटी ही केवळ एक सोसायटी नसून एक मोठे कुटुंब आहे. या मोठ्या कुटुंबाच्या गमतीजमती या मालिकेतून नेहमीच पाहायला मिळतात.

या ऑन-स्क्रीन कुटुंबाचा भाग असलेल्या कलाकारांच्या ऑफ-स्क्रीन कुटुंबांबद्दल देखील तेवढीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येते. विशेषतः गडा फॅमिली ही सगळ्यांचीच लाडकी फॅमिली आहे. या कुटुंबातील वयाने सर्वांत मोठी असणारी व्यक्तिरेखा म्हणजेच चंपकलाल गडा. जेठालालचे बाबूजी, दयाबेनचे प्रेमळ सासरे, टप्पूचे लाडके आजोबा म्हणजेच चंपकलाल. सगळे गोकुलधामकर त्यांना चंपकलाल चाचा म्हणून ओळखतात. काहीसे कर्मठ विचारांचे हे बाबूजी मनाने तितकेच चांगले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amit Bhatt (@amitbhattmkoc)

 

खऱ्या आयुष्यात मात्र चंपकलाल यांचे वय जेठालालपेक्षाही कमी आहे. ही भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट खऱ्या आयुष्यात खूपच रोमँटिक असलेले पाहायला मिळतात. आपल्या पत्नीवरचे प्रेम ते वेळोवेळी व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या पत्नीचे नाव कृती भट्ट आहे. कृती दिसायला खूपच सुंदर आहेत. अमित नेहमीच आपल्या सुंदर पत्नीबरोबरचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करताना दिसतात.

अमित आणि कृती दोघांनाही फिरायची खूप आवड आहे. वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत हे दोघे तेथील फोटो सोशल मीडिया वर पोस्ट करताना दिसतात. या फोटोंमध्ये कृती यांना पाहिल्यानंतर लक्षात येईल, की त्या दिसायला विलक्षण देखण्या आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बबिताजी साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता मालिकेत आपल्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करताना दिसते. मात्र कृती यांचे फोटोत पाहिले की लक्षात येतं, की त्या तर दिसण्यात बबिताजींपेक्षाही काकणभर सरस आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amit Bhatt (@amitbhattmkoc)

कृती नेहमीच ‘तारक मेहता का…’ च्या सेटवर येताना दिसतात. सेटवरील मंडळींशी इतक्या वर्षांमध्ये त्यांचे चांगलेच ऋणानुबंध जुळून आले आहेत. विशेषतः मालिकेतील महिला मंडळाशी त्यांचे चांगलेच सूत जमले आहे. तर अशा या कृती आपले पती अमित यांच्याबरोबर विनोदी व्हिडिओ बनवून ते सोशल मीडिया वर अपलोड करत असतात. त्यांच्या या व्हिडिओजना खूपच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते. कृती यांची स्टायलिश बाजूही या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता येते. अमित यांचे आपल्या पत्नीवरील प्रेम त्यांच्या पोस्ट्स मधून दिसून येते. अलीकडेच त्यांनी एक फोटो शेअर करत त्यावर ‘तूच माझे सर्वस्व आहेस’ अशी कॅप्शन दिली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amit Bhatt (@amitbhattmkoc)