हम तो दिवाने। विद्यार्थ्यांसोबत शिक्षिकांचा भन्नाट डान्स व्हायरल…पहा तुम्हीही..

मित्रहो काळ खरच बदलत चाललाय आणि हल्ली खूपशा घटना हे वेळोवेळी आपल्याला जाणवून देत आहेत. अनेकदा कधी कल्पना पण केल्या नसतील अशा घटना पाहायला मिळतात आणि मग आपणच थक्क होऊन जातो. तसेच हल्ली तरुण पिढी देखील खूप पुढे आहे, त्यांच्यातील धडाडी, धाडसी वृत्ती चकित करते. प्रत्येक बाबतीत ते पुढे असतात, मग एखादे सामाजिक कार्य असो किंवा मनोरंजन असो. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की काही विद्यार्थी आणि शिक्षक अगदी दिलखुलास पणे डान्स करत आहेत.

विद्यार्थी आणि शिक्षण यांच्यातील नाते खरच निराळे असते, ते दोघे समवयस्क नसतात पण त्यांचे विचार आपोआप सहज जुळतात. त्यामुळे त्यांची मैत्री जगातली सर्वात सुंदर मैत्री असते. या व्हिडीओ मध्ये काही शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त आनंद घेत नृत्य करत आहेत. बॉलिवूड मधील ओठावर रेंगाळणारी गाणी आपल्याला ऐकायला येतात व त्यावर त्यांचा उत्तम असा डान्स सुद्धा पाहायला मिळतो. खूप वेगवेगळ्या स्टेप घेऊन डान्स करण्यात येत आहे.

आयुष्यात एखादा दिवस असा असायलाच हवा ज्यादिवशी आपण आपलं पद, हुद्दा,प्रॉपर्टी, शिक्षण अगदी सगळं बाजूला सारून मनसोक्तपणे खुल्याने जगून घेता येईल. तो एक दिवस पुरेसा असतो आठवणींचा साठा करून ठेवायला. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करत आहेत, खुपजनांना हा व्हिडीओ आवडला असून भरपूर लाईक्स सुद्धा मिळत आहेत. अनेक नेटकरी हा व्हिडीओ इतरांना शेअर करत आहेत त्यामुळे सर्वत्र हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

व्हिडीओ पाहून खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, त्यामुळे पूर्वीचे शिक्षक आणि त्यांना पाहून वाटणारी भीती आता हरवली आहे असं वाटत आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये पक्की दोस्ती झाली असून त्यांचे विचार एक झाले आहेत, त्यामुळे मुलांना शिक्षण आवडायला लागते. एक नवी उमेद निर्माण होते, रोज काहीतरी नवीन शिकायला मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षक जेव्हा मित्र बनतात तेव्हा विद्यार्थी सुद्धा अगदी मन मोकळं ठेवून सर्व प्रश्न सहज मांडतात.

या व्हिडीओला पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल, काही वेळासाठी वाटणार पण नाही की ते शिक्षक आणि विद्यार्थी आहेत असं. काळ बदलत चाललाय त्यामुळे परिस्थिती आणि परिस्थिती कडे पाहण्याचा दृष्टीकोन सुद्धा बदलत आहे आणि अशी मैत्री असणे देखील आनंदाची बाब आहे. तर मित्रहो तुम्ही सुद्धा हा व्हायरल होणार व्हिडीओ नक्की पहा, तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.