‘बिग बॉस मराठी’ मधील हा अभिनेता भीषण अपघातातून थोडक्यात बचावला! मात्र डोळ्याला दुखापत…

शिव ठाकरे हे नाव ‘बिग बॉस मराठी सिझन २’ मुळे सर्वांना परिचयाचं झालं होतं. शिव ‘बिग बॉस’ च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे. ‘बिग बॉस’ मध्ये येण्यापूर्वी शिव एमटीव्ही रोडीज मध्ये देखील सहभागी झाला होता. ‘बिग बॉस’ मुळे त्याच्या लोकप्रियतेत भर पडलेली पाहायला मिळाली. नुकताच त्याच्या बाबतीत एक भीषण प्रसंग घडला. देवदर्शनाहून परत येत असताना त्याच्या गाडीला गंभीर अपघात झाला आहे.

देवदर्शन करून शिव ठाकरे त्याच्या कुटुंबासह अमरावतीला आपल्या गावी जात होता. वाटेत त्याच्या गाडीला मागून एका टेम्पोने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्याच्या गाडीच्या मागच्या भागाचा पार चक्काचूर झालेला आहे. स्टिअरिंग व्हील वर ताबा असल्याने या अपघाताला भीषण रूप येण्यापासून वाचले, असे शिवने सांगितले. गाडीला धडक बसताच गाडी रस्त्याकडेला असलेल्या शेतात गेली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गाडीमध्ये शिव, त्याची आई, बहीण, भाऊजी आणि छोटी भाची होती. शिवच्या डाव्या डोळ्याच्या वर जबरदस्त मार लागला असून त्याला डोळ्याच्या वर टाके पडले आहेत. त्याच्या बहिणीच्या डोक्यालाही मुका मार लागला आहे. तसेच आईलाही किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र हा अपघात कुणाच्याही जीवावर न बेतता थोडक्यावर निभावला आहे. जखमी लोकांना लगेचच दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. आम्ही या अपघातातून थोडक्यात बचावलो, असे शिव म्हणाला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by मराठी कलाकार विश्व (@marathi_kalakar_vishva_)

शिवच्या डाव्या डोळ्याच्या वर झालेली जखम आणि उपचारानंतरचा त्याच्या बँडेज लावलेला फोटो सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. त्याची बहीण मनीषा ठाकरे त्याला भेटायला ‘बिग बॉस’ च्या घरात गेली होती. त्यामुळे बरेच लोक तिला देखील ओळखतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मनीषाला मुलगी झाली. त्यावेळी शिवने सोशल मीडिया वर ‘मी मामा झालो’ असे सांगत ही बातमी दिली होती.

शिव ठाकरेच्या अपघाताबद्दल ऐकून बऱ्याच जणांना धक्का बसला आहे. शिव ठाकरेचे चाहते ही अपघाताची बातमी ऐकून काळजीत पडले आहेत. शिव यातून लवकर बरा व्हावा यासाठी ते देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत.

तुमच्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे लेख नियमितपणे वाचत चला. रोज नवे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सना भेट द्या. तसेच तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका.