शाहरुख खानची मुलगी होणार या अभिनेत्याची सून? सुहाना खान आहे रिलेशनशिपमध्ये…

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हे नेहमीच एक आघाडीचं नाव राहिलेलं आहे. अनेक हिट चित्रपट त्याच्या नावावर आहेत. छोट्या पडद्यापासून शाहरुखने आपला अभिनयाचा प्रवास सुरू केला. मग हळूहळू मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. ‘बाजीगर’, ‘डर’ सारख्या चित्रपटांमधून नकारात्मक भूमिका साकारत त्याने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पुढे कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सारख्या चित्रपटांमुळे तो बॉलिवूडमध्ये रोमँटिक हिरो म्हणून प्रसिद्ध झाला.

शाहरुखने आपल्या चित्रपटांमुळे चित्रपट विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या या कामामुळे त्याने बॉलिवूडचा बादशहा ही पदवी मिळवली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात त्याचे चाहते पसरले आहेत. त्यामुळे त्याच्या कामासोबतच त्याच्या खासगी आयुष्यात काय चाललेले असते, याकडेही चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. अनेक वेळा तो त्याच्या खासगी आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळते.

शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खानचे फोटो तर नेहमीच सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसतात. अलीकडेच त्याचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणामुळे आर्यन बरोबरच शाहरुख खान देखील चर्चेत राहिला होता. शाहरुखची मुलगी सुहाना खान देखील सोशल मीडिया वर सक्रीय असते. आपल्या पोस्ट्समुळे ती देखील चाहत्यांच्या चर्चेचा विषय झालेली पाहायला मिळत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

अलीकडेच सुहाना खानच्या डेटींगच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. सुहाना सध्या एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाला डेट करत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे ती लवकरच या अभिनेत्याच्या घरची सून होणार असल्याचेही बोलले जात आहे. हा अभिनेता आहे चंकी पांडे. आर्यन खानला अटक झाली तेव्हा त्याची मैत्रीण म्हणजेच चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे देखील बरीच चर्चेत आली होती. आता सुहाना खानमुळे चंकी पांडेच्या मुलाची चर्चा होताना दिसत आहे.

असे म्हटले जात आहे, की सुहाना खान चंकी पांडेचा मुलगा अहान पांडे याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच शाहरुख खान चंकी पांडेच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी जाणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र याबद्दल शाहरुख खान किंवा चंकी पांडे यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच सुहाना किंवा अहान कडूनही या बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र दोघे नेहमीच एकत्र दिसत असल्याने या दोघांचे हे फोटो सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत.