बापरे! एवढे मानधन.! पुष्पा चित्रपटातील कलाकारांनी घेतले कोट्यवधी रुपयांचे मानधन..जाणून घ्या..

मित्रहो दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होत असतात, त्यातील सर्व कलाकार देशभर लोकप्रिय आणि प्रसिद्ध होताना आपण पाहतो. त्यामधील नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट “पुष्पा” भलताच लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाने तर पहिल्याच दिवशी थिएटर फुल्ल करून टाकले होते. रसिक या चित्रपटाचे, यातील गाण्यांचे दिवाने झाले आहेत, प्रत्येकाच्या ओठांवर हल्ली यातील गाणी सर्रास ऐकायला मिळतात. त्यामुळे या चित्रपटाबद्दल आणि यातील कलाकारांच्या बद्दल रसिकांचे कुतूहल वाढले आहे.

आज आपण यामध्ये काम केलेल्या कलाकारांनी किती रक्कम घेतली आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. ही रक्कम ऐकून तुम्ही सुद्धा थक्क होऊन जाल. यामध्ये सर्वच कलाकारांनी या रकमेनुसार काम देखील उत्तम आणि उत्कृष्ट केले आहे.

यामध्ये धनंजया हा कन्नड अभिनेता आपल्या सर्वानाच माहीत आहे, त्याने पुष्पा द राईज मध्ये काम केले आहे. या चित्रपटात त्याला जॉली रेड्डी याची भूमिका मिळाली होती. ही भूमिका त्याने खूप छान निभावली आहे, त्याला या कामासाठी जवळपास ८० लाख इतके मानधन मिळाले आहे.

तसेच या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील गाजलेला, नावाजलेला, कलाकार फवाज फाजील याने देखील या चित्रपटात काम केले असून त्याने या चित्रपटात भवर सिंह शेखावतची भूमिका निभावली आहे. त्याला या भूमिकेसाठी तब्बल १ कोटी इतके मानधन मिळाले आहे.

तसेच देशभर लोकप्रिय आणि प्रसिद्ध असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा ही सुद्धा यामध्ये दिसली आहे. तिने या चित्रपटात आयटम सॉंग वर खूपच सुंदर नृत्य केले आहे. तिला यासाठी ५० लाख इतके मानधन मिळाले आहे. तिचे सर्व चाहते या चित्रपटात तिला पाहून खूप खुश आहेत. सोशल मीडियावर तिची खूप चर्चा सुद्धा सुरू आहे.

तसेच दाक्षिणात्य चित्रपटात नेहमीच विरोधी भूमिका साकारणारा सुनील आता या चित्रपटात मात्र तो पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर झळकला आहे. त्याला या भूमिकेत पाहून सर्व रसिक मंडळी चकित आहेत, खुश आहेत. त्याने ही भूमिका उत्कृष्ट निभावली असून त्याला यासाठी तब्बल १ कोटी रुपये मिळाले आहेत.

तसेच या चित्रपटात भूमी रेड्डी नायडू ची भूमिका राव रमेश हीने पार पाडली आहे. या भुमिकेसाठी तिला जवळपास ३० लाख इतके मानधन मिळाले आहे.

तसेच या चित्रपटात लोकप्रिय अजयने देखील काम केले असून, त्याने यामध्ये अल्लू अर्जुन यांच्या चुलत भावाची भूमिका पार पाडली आहे. त्याने या भूमिकेसाठी ३० लाख रुपयांचे मानधन घेतले आहे.

अनुसया भारद्वाज या अभिनेत्रीने या चित्रपटात दक्षिणायीची भूमिका स्वीकारली असून ती उत्तम रित्या निभावली आहे. या भूमिकेसाठी तिला जवळपास ४० लाख रुपयांचे मानधन मिळाले आहे.

पुष्पा…. मध्ये कोंडा रेड्डी ही भूमिका जबरदस्त वाटते, आणि ही भूमिका निभावणारी व्यक्ती देखील तशी जबरदस्तच आहे. ही। भूमिका ज्याने निभावली त्याचे नाव अजय घोष असे असून त्याने या भूमिकेसाठी ६० लाख रुपये इतके मानधन घेतले आहे.

तसेच सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे श्री बवी हिची, ही भूमिका निभावणारी अभिनेत्री सर्वानाच खूप आवडते. रश्मीका मंदाना ही सध्या भारताची नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध आहे. तिने या चित्रपटात उत्कृष्ट काम केले आहे , आणि या कामासाठी तिने तब्बल ३ कोटी इतकी रक्कम घेतली आहे.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन या चित्रपटाचा मुख्य भाग आहे, त्याने या चित्रपटात अतिउत्कृष्ट काम केले आहे. रसिक मंडळी त्याच्या अभिनयावर प्रचंड खुश आहेत. त्याने या भूमिकेसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचे मानधन घेतले असून त्यामानाने त्याचा अभिनय सुद्धा आहे. त्याची ही जबरदस्त भूमिका अनेकांचे मन हिरावून नेत आहे.

तर मित्रहो “पुष्पा द राईज” हा चित्रपट खूपच सुंदर आहे, हा चित्रपट तुम्ही देखील पहा. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.