आणखी एक लग्न..!.”नकुशी” मालिकेतील या अभिनेत्रीचे झाले लग्न.

मित्रहो बघता बघता आपले अनेक कलाकार विवाहबद्द झाले, त्यांच्या जोडीदाराची सोशल मीडियावर ओळख सुद्धा करून देण्यात आली होती आणि अजूनही हा लग्नाचा सिझन कार्यरत आहेच. आता सोशल मीडियावर आणखीन एक बातमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये आपल्या सर्वांची आणखी एक लाडकी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली असून तिने आपल्या जोडीदारासोबत काही खास फोटो देखील शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते चकित झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prasiddhi (@prasiddhi_kishor)

ही अभिनेत्री आहे “नकुशी” या गाजलेल्या मालिकेतील मुख्य भूमिकेत झळकलेली प्रसिद्धी किशोर. प्रसिद्धी हीने स्टार प्रवाह वरील “नकुशी” मालिकेत नकुशीची भूमिका पार पाडली होती. तिच्या या भूमिकेला फार कमी वेळात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते, या भूमिकेने तिला भरपूर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली आहे. शिवाय यातील अभिनय देखील तिच्या भूमिकेला आणखीनच खुलवताना दिसून येतो त्यामुळे एक कलाकार म्हणून तिने रसिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे.

प्रसिद्धी ही या मालिकेतून घराघरात पोहचली आहे, त्यामुळे तिला अनेक लोक सहज ओळखतात. तसेच सोशल मीडियावर सुद्धा ती खूप सक्रिय असते, नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सुद्धा खूप चर्चा रंगवत आहे. तिने ५ फेब्रुवारी रोजी दुबई मध्ये स्थित असणाऱ्या ओंकार वर्तक सोबत आपली लग्नगाठ बांधली आहे.तिचा हा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला असून याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prasiddhi (@prasiddhi_kishor)

गेल्या वर्षी प्रसिद्धी आणि ओंकारचा साखरपुडा पार पडला होता आणि यावर्षी त्या दोघांनी लग्न केले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोना पाहून अनेक नेटकरी व चाहते शुभेच्छा देत आहेत. शिवाय त्यांच्या फोटोंवर छान छान कमेन्ट देखील करत आहेत. लाईक्सचा पाऊस देखील पडत आहे. त्यामुळे प्रसिद्धी आणि ओंकार खूप चर्चेत आले आहेत. ओंकार हा दुबई मध्ये कार्यरत आहे, त्यामुळे आता प्रसिद्धी पण दुबई मधेच स्थायिक होईल का असा अनेकजण प्रश्न करत आहेत.

प्रसिद्धी नेहमीच एक अभिनेत्री म्हणून लोकप्रिय राहिली आहे, तिने “नकुशी” मालिकेतून देखील खूप प्रसिद्धी मिळवली आहे. याशिवाय तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटक यामध्ये काम केले आहे. तिचे वडील किशोर आयलवार हे एक नाट्य अभिनेते म्हणून ओळखले जातात, त्यामुळे हा अभिनयाचा वारसा तिला त्यांच्याकडूनच मिळाला आहे आणि तिने हा वारसा उत्कृष्ट रीतीने जपला आहे. पुन्हा एकदा ओंकार आणि प्रसिद्धी या दोघांनाही त्यांच्या नव्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.