‘परदेशी परदेशी जाना नहीं’ गाण्यातील हि अभिनेत्री आता दिसते अशी..पाहून ओळखणार हि नाही..

आजच्या चित्रपटांची गाणी तुम्हाला कदाचित आठवत नसतील, पण जुन्या काळातील हिट गाणी आजही तुमचा ऐकण्यात असतील. कदाचित हेच कारण आजही लोकांना जुनी गाणी जास्त आवडतात. आमिर खान आणि करिश्मा कपूर यांचा चित्रपट ‘राजा हिंदुस्तानी’ मधील ‘परदेशी परदेशी जाना नहीं’ हे देखील अतिशय प्रसिद्ध गाणे होते, जे लोक अजूनही मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये गाऊन पैसे कमवतात.

ज्या अभिनेत्रीवर हे गाणे चित्रित करण्यात आले होते त्या अभिनेत्रींचे नाव प्रतिभा सिन्हा असे आहे, जिचा जन्म ७ जुलै १९७९ रोजी झाला होता. ती पूर्वीची सुप्रसिद्ध अभिनेत्री दुसरी कोणी नसून ‘माला सिन्हा’ आहे आता ती ५१ वर्षांची झाली आहे आणि २००० नंतर तिने बॉलिवूड आणि मीडिया दोघांपासून अंतर केले.

प्रतिभा सिन्हाने काही ठराविकच फिल्ममध्ये काम केले होते ज्यात ‘राजा हिंदुस्तानी’ सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट होता. नंतर तिने “ले चल अपने संग’, मिलिट्री राज’,’ज़ंज़ीर’, ‘ कोई किसी से कम नहीं’, ‘दीवाना मस्ताना’, ‘तू चोर मैं सिपाही’, ‘एक था राजा’,’दिल है बेताब’, ‘कल की आवाज़’, ‘आंधियां’ या सारख्या चित्रपटामध्ये काम केले.

तिने का बॉलिवूड इंडस्ट्री सोडली हे कधी उघड झाले नाही, पण माध्यम सूत्रांच्या म्हणण्यानुसार ती संगीतकार नदीमच्या प्रेमात पडली ज्यामुळे चित्रपटांमध्ये तिचे मन लागले नाही आणि पडद्यापासून त्याने आपले अंतर दूर केले.

नदीम वरती लशन कुमारचा खू-न केल्याचा आ-रोप केला गेला होता. आणि जेव्हा माला सिन्हाला हि बातमी समजली तेव्हा त्यांनी प्रतिभाला चेन्नईला पाठवले.