‘टाईमपास’ चित्रपटाच्या गाण्यातील या अभिनेत्रीचा पार पडला विवाहसोहळा व्हायरल झाले फोटो…!

मित्रहो हल्ली लग्नाचा सिझन चालाय त्यामुळे अनेक कलाकार विवाह बंधनात अडकताना दिसत आहेत, सोशल मीडियावर अनेकांचे फोटो पाहायला मिळत आहेत. आपल्या जोडीदाराच्या शोधात असलेल्या आणखीन एका अभिनेत्रीची शोधमोहीम आता संपली आहे. नुकताच या अभिनेत्रीचा लग्नसोहळा अगदी थाटात पार पडला आहे. मित्रहो ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून “टाईमपास” फेम शिबानी दांडेकर आहे. तिचे “ही पोली साजूक तुपातली” हे गाणे तुफान गाजले आहे. या गाण्यावर आजही लोक मजेत नाचतात.

हे गाणे चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा भरपूर प्रमाणात लोकप्रिय झाले होते, या गाण्यावर अनेकांनी आपला डान्स व्हिडीओ बनवला होता. पण या गाण्यावर ताल धरून नाचणारी शिबानी अगदी या गाण्याला योग्य शोभते. म्हणून तर हे गाणे तिच्यावर चित्रित झाले असून, तिने यातील अभिनय उत्कृष्ट केला आहे. या चित्रपटातून शिबानी खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली आहे, त्यामुळे तिचे चाहते सर्वत्र असतातच. सोशल मीडियावर देखील शिबानी खूप सक्रिय असते, तिचे अनेक चाहते तिला फॉलो करतात.

शिबानीने नुकताच आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे, व्हायरल झालेल्या फोटोतून कळते की नुकताच तिचा विवाहसोहळा पार पडला आहे. मॉडेल, अभिनेत्री, गायिका, सुत्रसंचालिका असणारी शिबानी गेल्या काही महिन्यांपासून फरहान अख्तर सोबत विवाह करणार झाल्याची चर्चा सुरू आहे. मित्रहो १९ फेब्रुवारी २०२२ या दोघांचा मोठ्या थाटाने लग्नसोहळा पार पडला आहे. चित्रपट सृष्टीतील हा सोहळा खूप मोठा आहे, त्यामुळे अनेक कलाकारांनी या सोहळ्यात आवर्जून हजेरी लावली होती.

हा सोहळा पुण्यातील खंडाळा येथील थंड हवेच्या, निसर्ग रम्य वातावरण पार पडला आहे. त्यांनी खूप निराळ्या पद्धतीने लग्न केले आहे, ना फेरे घेतले, ना निकाह केला. त्यांनी केवळ विश्वास देऊन, वचनांची बांधिलकी केली आहे. शिबानी दांडेकर ही मूळची पुण्याची आहे, पण कामानिमित्त त्यांचे कुटुंबीय परदेशात स्थायिक झाले होते. परदेशात तिने होस्ट मधून काम केले, भारतात परतल्यावर ती अनेक प्रोजेक्ट मधून पडद्यावर येत राहिली आहे. मराठी चित्रपटातून तिने अनेकदा भेट दिल्याने एक मराठमोळी मुलगी म्हणून तिची भरपूर ओळख झाली.

View this post on Instagram

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar)

कपिल शर्मा शोमध्ये शिबानी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दाखल झाली होती. त्यावेळी मात्र तीने कपिल शर्माला चांगलेच खडसावले होते. “मराठी चांगलं बोलता येत मला हिंदी येत नाही, तुला मराठी येत नाही का…? तू मुंबईत राहतोस आणि मराठी येत नाही..!” तिचे हे बोलणे ऐकून सर्वजण थक्क झाले होते. शिबानी आणि फरहान दोघेही गेल्या चार वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. आता या दोघांनी आपला हा विवाह सोहळा थाटात साजरा केला आहे. त्या दोघांनाही त्यांच्या नव्या जीवनासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.