‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अभिनेत्रीचा झाला साखरपुडा! चाहते लग्नाच्या प्रतीक्षेत…

सध्या सगळीकडेच सनई-चौघड्यांचे सूर कानावर पडताना दिसत आहेत. सगळीकडेच लग्नाची धामधूम आहे. मग या सगळ्यापासून सेलिब्रेटी कसे लांब राहतील बरं! त्यामुळे मराठी मनोरंजन विश्वातही सध्या सनई-चौघड्यांचे सूर घुमताना दिसत आहेत. अनेक मराठी कलाकार सध्या बोहल्यावर चढताना दिसत आहेत. त्यामुळे मनोरंजन विश्वात अनेक शुभकार्य पार पडताना दिसत आहेत. कुणाचे साखरपुडा होताना दिसत आहे, तर कुणी लग्नाच्या वेदीवर चढताना दिसत आहे. सध्या सोशल मीडिया वर अशाच एका सेलिब्रेटी कलाकाराच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे.

कलर्स मराठी वाहिनी वर सध्या ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. अनेक लोक स्वामी समर्थांचे भक्त असल्याने ते ही मालिका आवर्जून बघत असतात. त्यांना ही मालिका खूप आवडते आहे. मालिकेतील पात्रं देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ही पात्रं साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचे झाले आहेत. यातील अशीच एक कलाकार आहे पूजा रायबागी.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PUJA RAIBAGI (@poojaraibagi_official)

अभिनेत्री पूजा रायबागीने ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत चांदुलीची खाष्ट आई कालिंदी साकारली आहे. हे पात्र खलनायकी असलं तरी ही कालिंदी प्रेक्षकांची खूप आवडती आहे. नुकताच या अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला. पूजाने अभिनेता प्रसाद डबके सोबत साखरपुडा केला आहे. प्रसाद डबके अलीकडेच स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत झळकला होता. त्याने या मालिकेत गोपीनाथ पंत बोकील ही भूमिका साकारली होती.

पूजा आणि प्रसादचा हा साखरपुड्याचा सोहळा खूप थाटात पार पडला. आपल्या या सुंदर क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ पूजाने सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. पूजाच्या चाहत्यांनी या फोटोज आणि व्हिडिओज वर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिचे अभिनंदन केले आहे. याशिवाय अनेक कलाकारांनीही पूजा आणि प्रसादचे अभिनंदन केले आहे. या फोटो आणि व्हिडिओ मध्ये पूजा खूपच सुंदर दिसते आहे. आपल्या या खास क्षणांसाठी ती खूप सुरेख तयार झालेली पाहायला मिळते. तिची आणि प्रसादची केमिस्ट्री या फोटोंमधून पाहायला मिळते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PUJA RAIBAGI (@poojaraibagi_official)

पूजाचे चाहते आता त्यांच्या लग्नाच्या तारखेची वाट पहात आहेत. मंडळी, तुम्हाला पूजाची कालिंदी ही भूमिका आवडते का, ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. पूजा आणि प्रसाद यांचे त्यांच्या साखरपुड्यानिमित्त अभिनंदन!