बाळासाहेबांनी “राजकारणाची ऑफर” देताच लता मंगेशकर यांनी दिले होते असे उत्तर…

मित्रहो आपल्या रसाळ वाणीने, गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून तल्लीन करणाऱ्या दिग्गज गायिका लता मंगेशकर यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने सर्व रसिक मंडळी, कलाक्षेत्रात कार्यरत असणारे सर्व कलाकार, राजकीय नेते या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या अनेक आठवणी आज पुन्हा नव्याने ताज्या होत आहेत. वयाच्या १३ व्या वर्षांपासून त्यांनी गायकीला आपलेसे केले होते, आणि याच गायिकीतून रसिकांनी त्यांना आपलेसे केले आहे.

१९४२ पासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता मात्र आपलं ध्येय गाठण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या सोबतीला राहिली. आज त्यांचे नाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना ठाऊक आहे, तसेच लता मंगेशकर म्हणजे संगीत क्षेत्राचा श्वास….अस म्हणायला काहीच हरकत नाही. लता मंगेशकर यांच्या अनेक किस्से खूप रंजक आहेत. त्यातीलच एक किस्सा आज या लेखातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो.

मित्रहो हा किस्सा बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यातील छान आठवण आहे, हे दोघेही खूप चांगले मित्र होते. बाळासाहेब ठाकरे हे लता मंगेशकर याना आपली बहीण मानत होते, त्यांच्या परिवारात खूप जवळचे संबंध होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारण करण्याच्या, सांभाळण्याच्या पद्धतीचे लतादीदी नेहमीच खूप कौतुक करायच्या. तसेच लतादीदींच्या मधुर आवाजाचे बाळासाहेब सुद्धा भरपूर कौतुक करायचे.

ते दोघे खूप गप्पा मारायचे, कधी त्यांना भेटायला वेळ नाही मिळाला तर ते एकमेकांच्या वाढदिवसाला एकमेकांच्या घरी जायचे, शुभेच्छा देण्यासाठी. इतकेच नव्हे तर कधी कधी बाळासाहेब यांच्या कलनगरच्या घरी संपूर्ण कुटुंब खूपदा जायचे. दरम्यान असेच संपूर्ण कुटुंब एकत्र आले तेव्हा बाळासाहेबांनी लतादीदींना राजकारणात येण्याची ऑफर दिली होती. पण आश्चर्य म्हणजे त्यावेळी लता दीदींनी त्या ऑफरला नाकारले. त्या म्हणाल्या “बाळासाहेब राजकारण हा आमचा प्रांत नाही. पण तुम्ही राजकारणाच्या माध्यमातून खूप चांगलं काम करत आहात. तुमच्या या कार्याला माझ्या खुप शुभेच्छा.”

लता मंगेशकर यांचं उत्तर ऐकून बाळासाहेब देखील चकित झाले होते….. पण नंतर त्यांनाही हे उत्तर पटलं आणि त्यांनी पुन्हा कधीच लतादीदींना राजकारणात येणार का ? असा प्रश्न केला नाही. लता मंगेशकर आणि बाळासाहेब यांचे हे बहिणभावाचे नाते खरच खूप सुंदर होते, त्यानी आपले नाते खूप छान जपले होते. आयुष्यातील सुख, दुःख अगदी हक्काने वाटून घेतली होती. म्हणून तर बाळासाहेबांच्या निधनानंतर देखील मंगेशकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यात ऐक्य आहे तसेच राहिले आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मंगेशकर कुटुंबासोबत असलेले आपले नाते तसेच जपून ठेवले आहे. तसेच मुंबई मध्ये शिवाजीपार्क मध्ये बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्याच ठिकाणी लता दिदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यावेळी लोकांची अफाट गर्दी नजरेस पडत होती, खरच येता जाता आपण जरी रिकामे असलो तरीही मिळवलेली माणुसकी आणि प्रेम कधीच आपली साथ सोडत नसते. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.