म्हणून ‘जय भीम’ चित्रपटाच्याच्या लेखकाने परत केले मिळाले मानधन! कारण वाचून धक्का बसेल…

सध्या ‘जय भीम’ या चित्रपटाची बरीच चर्चा होताना दिसत आहे. कुठेतरी यातील कथानकाचे आणि अभिनयाचे कौतुक केले जात आहे, तर कुठेतरी यातील खळबळजनक दृश्यांनी नवीन वादाला तोंड फुटले आहे. नुकतंच या वादातून या चित्रपटाचे संवादलेखक कन्मणी गुणशेखरन यांनी आपली मानधनाची रक्कम परत केली आहे. ‘द हिंदू’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतः ही माहिती दिली. याशिवाय त्यांनी आपली नाराजी एका फेसबुक पोस्टद्वारे देखील जाहीर केली आहे.

चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांवर नाराजी व्यक्त करताना कन्मणी गुणशेखरन म्हणाले, “मी दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार चित्रपटाचे संवाद लिहिले. प त्यातील वादग्रस्त दृश्यांची मला कल्पना नव्हती. तुम्ही माझा विश्वासघात केलाय.” साधारण दोन वर्षांपूर्वी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी कन्मणी गुणशेखरन यांना चित्रपटाचे संवाद लिहिण्याची ऑफर दिली होती. चित्रपटात बरेच ग्रामीण संवाद असल्याने कन्मणी गुणशेखरन यांना ती ऑफर देण्यात आली होती. कन्मणी यांना त्यावेळी वादग्रस्त कॅलेंडर दृश्याची कल्पना त्यावेळी नव्हती, असा दावा कन्मणी यांनी केला.

वेन्नियार समुदायाने ‘जय भीम’ मधील या कॅलेंडर दृश्यावर आक्षेप घेत सूर्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. चित्रपटातील काही दृश्यांमुळे वेन्नियार समुदायाची बदनामी झाली आहे आणि प्रतिमाहनन करणारी ती दृश्यं मुद्दाम चित्रपटात दाखवण्यात आली आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. लेखक कन्मणी गुणशेखरन देखील याच समुदायातील आहेत. त्यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कन्मणी गुणशेखरन यांनी याबाबत राग व्यक्त करताना सांगितले, की “ओटीटी रिलीजमुळे दिग्दर्शकांनी वादग्रस्त दृश्ये तशीच ठेवली आहेत. त्यामुळे दोन समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण झाले आहे. चित्रपटासाठी मी Eli Vettai हे नाव सुचवले होते. दिग्दर्शकानेही या नावाला होकार दिला होता. पण चित्रपटाची जाहिरात पाहिल्यावर ‘Eli Vettai’ हे नाव बदलून चित्रपटाला ‘जय भीम’ हे नाव देण्यात आल्याचे मला कळले.”

कन्मणी पुढे म्हणाले, “चित्रपटातील व्यक्तिरेखांना कदाचित मुद्दाम नकारात्मक नावे देण्यात आली. वादग्रस्त दृश्य टाकून एका समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याबद्दल आता तुम्ही माफी मागताय. अन त्याला अर्थ नाही. तुम्ही माझा विश्वासघात केलाय. पाठीमागून वार करणारी अशी लोकं भविष्यात कधीच भेटू नयेत. मी माझा ५० हजारांचा धनादेश परत पाठवत आहे.”

दिग्दर्शकाच्या सांगण्यानुसार आपण संवाद लिहिले, मात्र वादग्रस्त दृश्यांबद्दल आपल्याला आधी कोणतीच कल्पना दिली नसल्याचे कन्मणी गुणशेखरन यांनी सांगितले. दिग्दर्शकावर विश्वासघाताचा ठपका ठेवत त्यांनी आपला राग व्यक्त केला.