रेल्वेची धडक बसलेली गाय वाचली केवळ नशिबाने! पाहा व्हिडिओ…

एखाद्याचे नशीब बलवत्तर असेल, तर त्याला अगदी मृत्यूही संपवू शकत नाही असं म्हणतात. अशीच काहीशी घटना एका गायीच्या बाबतीत घडलेली पाहायला मिळत आहे. मृत्यू समोर आलाच होता, मात्र केवळ नशीब चांगलं म्हणून ही गाय वाचली. रेल्वेची धडक बसली, मग ही गाय पाण्यातही पडली. मात्र केवळ नशिबाने ती आज जिवंत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतो, की एका मोठ्या नाल्यावर एक पूल आहे. हा पूल केवळ रेल्वेसाठी बांधण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी या पुलाचा वापर होऊ शकत नाही. एक सरळ साधा रेल्वे रूळ या पुलावरून गेलेला पाहायला मिळतो. मात्र अशावेळी एक गाय देखील आपल्याला त्या पुलावर पाहायला मिळत आहे. रेल्वेरूळाच्या शेजारी काही रिकामी जागा ठेवण्यात येते. त्या रिकाम्या जागेत ही गाय उभी असलेली पाहायला मिळते. इतर कोणताही प्राणी किंवा मनुष्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही.

मात्र एका बाजूने या रुळांवरून रेल्वे धावताना दिसत आहे. एका बाजूने रेल्वे आल्याने आणि पुलावर दुसरीकडे कुठेच जागा नसल्याने त्या गायीची कोंडी झाली आहे. जर ती पुलावरून बाजूला झाली नाही तर नक्कीच तिच्या जीवाला धोका आहे. तिच्याकडे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक दिसत नाही. आणि अगदी अशावेळी ती रेल्वे तिच्या शेजारून जाते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Noor Khan (@khannoor30621)

अर्थातच गायीला त्या भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेचा जबरदस्त धक्का बसतो. वाऱ्याने एखादा पालापाचोळा भिरभिरत जावा, तशी ती गाय भेलकांडत पुलाखालच्या नाल्यात जाऊन पडते. हे पाहिल्यानंतर कोणालाही वाटेल, की ती गाय आता जिवंत राहू शकत नाही. मात्र तिचे नशीब चांगले, म्हणून त्या नाल्यात जास्त पाणी नव्हते. गाय जरी त्या नाल्यात आपटली असली तरी ती पटकन आपल्या पायांवर उभी राहते. आपण पाहू शकतो, की ही गाय अगदी सुखरूप आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरील khannoor३०६२१ या अकाऊंट वरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन देखील अत्यंत साजेशी देण्यात आली आहे. या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, की ‘जाको राखे सांईयां, मार सके ना कोय’. देव तारी त्याला कोण मारी अशा अर्थाची ही कॅप्शन या व्हिडिओला अगदी साजेशी आहे. कारण या म्हणीचा प्रत्यय या व्हिडिओ मधून येतो.